रिंकू सिंगला वर्ल्डकप न खेळता लागली ‘लॉटरी’, हार्दिक पंड्याला बसला फटका

| Updated on: Jul 10, 2024 | 3:29 PM

ICC ने T20 क्रिकेटची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंना चांगला फायदा झाला आहे. भारतीय संघाचा फलंदाज रुतुराज गायकवाडने टॉप-10 मध्ये प्रवेश केलाय. तर अष्टपैलू हार्दिक पांड्याला या ताज्या क्रमवारीत नुकसान झाले आहे.

रिंकू सिंगला वर्ल्डकप न खेळता लागली लॉटरी, हार्दिक पंड्याला बसला फटका
Follow us on

ICC T20 Ranking : ICC ने T20 क्रिकेटची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा बॅट्समन रुतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांनी मोठी झेप घेतली आहे. रुतुराज गायकवाड टॉप-10 मध्ये आला आहे. तर रिंकू सिंगनेही 4 स्थानांनी झेप घेत 39 वे स्थान गाठले आहे. पण भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा हार्दिक पंड्या याला मात्र फटका बसला आहे. या नव्या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर होता. पण आता तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेचा खेळाडू वानिंदू हसरंगाने पहिला क्रमांकावर पोहोचला आहे.

टॉप-5 अष्टपैलू खेळाडू

श्रीलंकेचा खेळाडू वानिंदू हसरंगा आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. वानिंदू हसरंगा 222 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या २१३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस आहे. त्याच्याकडे 211 रेटिंग पॉईंट्स आहेत. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझालाही फायदा झाला आहे. सिकंदर रझा हा जगातील चौथा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

टॉप-5 अष्टपैलू खेळाडूंची यादी

1 श्रीलंका वानिंदू हसरंगा 222
2 भारत हार्दिक पंड्या 213
3 ऑस्ट्रेलिया मार्कस स्टॉइनिस 211
4 झिम्बाब्वे अलेक्झांडर रझा 208
5 बांगलादेश शाकिब अल हसन 206

टॉप-5 फलंदाजांची क्रमवारी

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडू रुतुराज गायकवाडला मोठा फायदा झाला आहे. रुतुराज सिंगने 20व्या स्थानावरून थेट 7व्या स्थानावर झेप घेतली आहे. रुतुराजचे रेटिंग पॉईंट्स ६६२ आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. ज्याचे 844 गुण आहेत. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांचे 821 रेटिंग गुण आहेत.

1 ऑस्ट्रेलिया ट्रॅव्हिस हेड 844
2 भारत सूर्यकुमार यादव 821
3 इंग्लंड फिल सॉल्ट 797
4 पाकिस्तान बाबर आझम 755
5 पाकिस्तान मोहम्मद रिझवान 746
7 भारत रुतुराज गायकवाड 662