IPL चा 14 वा इमर्जिंग प्लेयर ऋतुराज गायकवाड, नेमका कसा मिळतो हा मान? कोण आहेत याआधीचे इमर्जिंग प्लेयर?
चेन्नई सुपरकिंग्सनं आयपीएलच्या 14 व्या पर्वाची ट्रॉफी खिशात घातली. पण यंदा सर्व संघात हवा झाली ती मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची. त्याने आपल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इमर्जिंग प्लेयर हा मानाचा खिताबही पटाकवला.
1 / 6
चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला IPL 2021 या पर्वाचा इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी हा खिताब एका नव्या खेळाडूला दिला जातो. आतापर्यंत हा मान मिळालेले 14 पैकी 13 खेळाडू भारतीय असून एकमेव विदेशी खेळाडू म्हणजेच बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान याला हा मान मिळाला आहे.
2 / 6
इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार मिळण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. जसंकी संबधित खेळाडू हा 1 एप्रिल 1995 नंतर जन्माला आलेला असायला हवा. तो कमीत कमी 5 टेस्ट किंवा 20 हून कमी वनडे सामने खेळेलेला हवा. तिसरा म्हणजे IPL मध्येही 25 हून कमी सामने खेळलेला हवा. तसंच याआधी त्याने हा खिताब जिंकलेला नसणे गरजेचे असते. या सर्वांमध्ये बसून जो संपूर्ण पर्वात उत्कृष्ट खेळी करतो त्याला हा खिताब दिला जातो.
3 / 6
IPL च्या सर्वात पहिल्या पर्वाचा इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार श्रीवत्स गोस्वामी याला देण्यात आला होता. त्यानंतर 2009 मध्ये रोहित शर्मा याला हा मान मिळाला. तेव्हा तो डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. 2010 मध्ये मुंबई इंडियन्सच्या सौरभ तिवारीला आणि 2011 मध्ये इकबाल अब्दुल्लाला पुरस्कार मिळाला. 2012 आणि 2013 ला अनुक्रमे पंजाबच्या मंदीप सिंगला तर राजस्थानच्या संजू सॅमसनने हा मान मिळवला. तर 2014 मध्ये पंजाबच्या अक्षर पटेलने आणि 2015 मध्ये दिल्लीच्या श्रेयस अय्यरने पुरस्कार स्वत:च्या नावे केला.
4 / 6
IPL 2016 मध्ये पहिल्यांदा हा खिताब परदेशी खेळाडूने मिळवला. बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रेहमानने सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना हा मान मिळवला. 2017 मध्ये गुजरात लायन्सच्या बेसिल थंपीने हा मान मिळवला.
5 / 6
त्यानंतर 2018 ते 2020 सीजनमध्ये अनुक्रमे हा खिताब ऋषभ पंत, शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल यांना मिळाला.
6 / 6
आतापर्यं इमर्जिंग प्लेयर झालेल्या 14 पैकी 6 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. ज्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत, मुस्तफिजुर रहमान, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि शुभमन गिल यांच नाव आहे. तर संजू सॅमसन पडिक्कल आणि गायकवाड यांना अजून जास्त संधी मिळालेल्या नाहीत. तर इतर 5 खेळाडूंची कारकिर्द स्थानिक क्रिकेटपर्यंतच मर्यादीत आहे.