नवी दिल्ली: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय क्रिकेटमधला उदयोन्मुख स्टार आहे. त्याच्याकडे क्लासही आहे, वेगाने धावा करु शकतो आणि मोठी खेळी खेळण्यासही सक्षम आहे. पण तरीही या प्रतिभावान फलंदाजाला पुरेशी संधी मिळत नाहीय. गायकवाड टॅलेंटेड आहे. पण त्याला नशिबाची साथ मिळत नाहीय. मागच्या काही दिवसात ऋतुराज गायकवाड बरोबर असं काहीतरी झालय की, त्याची खेळण्याची संधी हुकली आहे. आज श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka, 1st T20I) पहिल्या टी-20 सामन्याआधी सुद्धा त्याच्याबरोबर असंच काहीतरी घडलं. ऋतुराज गायकवाड आज पहिल्या वनडेमध्ये (ODI) खेळणार होता. पण त्याआधी तो प्लेइंग इलेवनमधून बाहेर झाला
अचानक काय घडलं?
सामन्याआधी ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली. फलंदाजीचा सराव करत असताना ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली. अचानक त्याचं मनगट दुखू लागलं. त्यामुळे त्याला फटके खेळता येत नव्हते. अखेर ऋतुराजला संघात स्थान मिळालं नाही. त्याच्याजागी संजू सॅमसनची निवड करण्यात आली. गायकवाडच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने टि्वट करुन माहिती दिली आहे.
“ऋतुराज गायकवाडच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली आहे. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होतोय. तो पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाहीय. बीसीसीआयची मेडीकल टीम त्याच्या दुखापतीचा अभ्यास करतेय” असं बीसीसीआयने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
UPDATE – Ruturaj Gaikwad complained of pain in his right wrist, which is affecting his batting. He was unavailable for selection for the first T20I. The BCCI Medical Team is examining him.@Paytm #INDvSL
— BCCI (@BCCI) February 24, 2022
तेव्हा फक्त चार रन्सवर आऊट
वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीज आधी ऋतुराज गायकवाडला कोविडची बाधा झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकला नाही. त्यानंतर पहिल्या दोन टी 20 मध्ये त्याला संधी मिळाली नाही. अखेरच्या सामन्यात प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली. पण तो फक्त चार रन्सकरुन आऊट झाला.