मुंबई : 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सचा धडाकेबाज खेळाडू ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसेल. महाराष्ट्राला एलिट गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे आणि हा संघ लीग स्टेजचे सामने लखनौमध्ये खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना तामिळनाडूशी होणार आहे. (Ruturaj Gaikwad to lead Maharashtra in Syed Mushtaq Ali T20)
IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणारा ऋतुराज गायकवाड या स्पर्धेत आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर T20 विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघाचं दार ठोठावू शकतो. या मालिकेसाठी अनेक मोठे खेळाडू विश्रांती घेऊ शकतात, असे मानले जात आहे. गायकवाडने जुलै 2021 मध्ये श्रीलंका मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी शानदार खेळ दाखवला आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गायकवाडनंतर उपकर्णधारपदी नौशाद शेख याची नियुक्ती करण्यात आली आहे. शेख आणि गायकवाड हे चांगले मित्रही आहेत. मात्र, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघासाठी एक वाईट बातमीही आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा राहुल त्रिपाठी अद्याप आयपीएलच्या अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत त्याला संघात घेण्यात आलेले नाही. मात्र, वरिष्ठ फलंदाज केदार जाधवचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान म्हणाले, राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर आणि राज्यवर्धन हेंगरगेकर फिट नाहीत. त्यांच्या जागी स्वप्नील गुगळे, पवन शहा आणि जगदीश झोपे यांची निवड करण्यात आली आहे. त्रिपाठीला उपकर्णधार बनवण्यात आले होते पण तो मांडीच्या दुखापतीतून सावरला नाही. आयपीएलच्या फायनलमध्ये त्याला ही दुखापत झाली होती. अशा स्थितीत नौशाद शेखकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सिद्धेश वीरच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याचबरोबर राज्यवर्धनची अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्राकडे उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाधे, डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि गोलंदाजीत डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव हे पर्याय आहेत. बच्छाव फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नाहर, अझीम काझी, रणजित निकम, सत्यजित बच्छाव, तरनजीतसिंग ढिल्लों, मुकेश चौधरी, आशा पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाधे, शमशु जमा काझी, स्वप्नील फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, जगदीश जोप.
इतर बातम्या
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(Ruturaj Gaikwad to lead Maharashtra in Syed Mushtaq Ali T20)