5 वनडेत 4 शतकं, ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल; निवड समितीला विश्वास

| Updated on: Jan 01, 2022 | 1:02 PM

दक्षिण आफ्रिक दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक उगवत्या स्टार्सना स्थान मिळाले आहे. त्यापैकी एक नाव महाराष्ट्रातील फलंदाजाचे नाव आहे जो आयपीएलमध्ये एमएस धोनीचा उजवा हात मानला जातो.

5 वनडेत 4 शतकं, ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल; निवड समितीला विश्वास
Ruturaj Gaikwad
Follow us on

मुंबई : दक्षिण आफ्रिक दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक उगवत्या स्टार्सना स्थान मिळाले आहे. त्यापैकी एक नाव महाराष्ट्रातील फलंदाजाचे नाव आहे जो आयपीएलमध्ये एमएस धोनीचा उजवा हात मानला जातो. IPL 2021 मध्ये CSK साठी त्याने एकट्याने अर्ध्याहून अधिक धावा केल्या आहेत. पण, टीम इंडियात त्याला स्थान मिळण्याचं कारण म्हणजे त्याने अलीकडेच खेळल्या गेलेल्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकं झळकावली आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ही शतके झळकावली आहेत. त्याच्या बॅटचा आवाज बीसीसीआयच्या निवड समितीच्या कानापर्यंत अखेर पोहोचला. या खेळाडूचे नाव आहे ऋतुराज गायकवाड. या 24 वर्षीय फलंदाजाने भारताचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांचा विश्वास जिंकला आहे. शर्मा म्हणाले की, हा खेळाडू टीम इंडियासाठी चमत्कार करेल. (Ruturaj Gaikwad will do wonders for Indian team: Chetan Sharma)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. हे सामने 19, 21 आणि 23 जानेवारीला पार्ल आणि केपटाऊनमध्ये खेळवले जातील. सध्या भारताचा कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.

ऋतुराजला योग्य वेळी संधी : चेतन शर्मा

संघात निवड झालेल्या 24 वर्षीय ऋतुराजचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खूप कौतुक केले. शर्मा म्हणाले, “त्याला योग्य वेळी संधी मिळाली आहे. यापूर्वी तो टी-20 संघाचा भाग होता, आता तो एकदिवसीय संघात आला आहे. तो टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करेल याची आम्हाला खात्री आहे. 24 वर्षीय ऋतुराज हा आयपीएल 2021 आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

ऋतुराजला मेहनतीचे फळ

ऋतुराजने केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे चेतन शर्मा यांनी सांगितले. आम्ही त्याची निवड केली आहे, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये कुठे स्थान देता येईल हे संघ व्यवस्थापनाने ठरवायचे आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 संघात होता. आता त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळाले आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच कामगिरीचे त्याला बक्षीस मिळाले आहे.

वनडेसाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,

जानेवारी 2022 मध्ये क्रिकेटचा थरार, जगभरातील रसिकांसाठी पर्वणी, शेड्यूल पाहून सामने पाहण्याचा प्रोग्राम ठरवा

IND vs SA ODI Series: रोहित शर्माच्या जागी केएल राहुल कॅप्टन, बुमराह उपकर्णधार, असा आहे भारतीय संघ

Photos : स्मृती मंधानानं उंचावली भारताची मान, ICCनं केलं विशेष पुरस्कारासाठी नामांकन

(Ruturaj Gaikwad will do wonders for Indian team: Chetan Sharma)