AFG vs SA : T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनल मॅचसाठी बनवलेल्या पीचवरुन मोठा वाद, राशिद खान म्हणाला…

| Updated on: Jun 27, 2024 | 10:41 AM

AFG vs SA : दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तानमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सेमीफायनल सामना त्रिनिदादमध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये साऊथ आफ्रीकेने अफगानिस्तानला अवघ्या 56 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर आता पीचवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

AFG vs SA : T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनल मॅचसाठी बनवलेल्या पीचवरुन मोठा वाद, राशिद खान म्हणाला...
AFGvsSA
Image Credit source: PTI
Follow us on

T20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सेमीफायनल सामना त्रिनिदादमध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 9 विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवून पहिल्यांदा कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी जो पीच बनवला होता, त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 56 रन्सवर अफगाणिस्तानला ऑलआऊट केलं. यानंतर क्रिकेट एक्सपर्ट्स आणि कॉमेंटेटर्सनी आयसीसीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. राशिद खानने सुद्धा तक्रार केली आहे.

अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खानने T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. त्यांची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली, त्यावेळी पीचवर एक असामान्य उसळी पहायला मिळाली. त्याशिवाय या पीचवर अनेक तडे सुद्धा गेलेले होते. याचा उल्लेख ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पॉलक यांनी पीच रिपोर्टमध्ये केला. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये अफगाणी फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांसमोर सरेंडर केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

संजय मांजरेकर-नवज्योत सिंग सिद्धू काय म्हणाले?

कॉमेंट्री करताना संजय मांजरेकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी पीच खूप खराब असल्याच म्हटलं. त्यांनी आयसीसीला प्रश्न विचारले. या दोन दिग्गज क्रिकेटर्सच्या मते, इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी ही खूपच खराब विकेट होती. न्यूयॉर्कपेक्षा सुद्धा ही खराब विकेट असल्याच ते म्हणाले. मोहम्मद कैफ यांनी एनालिसिस नंतर हा खराब पीच असल्याच म्हटलं.

फ्लाईटला चार तास उशीर

अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खानने सुद्धा आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत. टॉसच्यावेळी त्याने सांगतिलं की, त्यांची फ्लाईट त्रिनिदादला चार तास उशिराने पोहोचली. त्यामुळे टीमला आराम करायला आणि प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही.

टीम इंडियाला सुद्धा याच स्थितीचा सामना करावा लागेल

टीम इंडियाला सुद्धा अफगाणिस्तान सारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. टीम इंडियाने इंग्लंडला सेमीफायनलमध्ये हरवलं, तर त्यांना मध्ये गॅप मिळणार नाही. पावसामुळे फ्लाईटसला विलंब होऊ शकतो. फायनल मॅच लोकल टाइमनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. त्यामुळे प्रॅक्टिसला आणि आराम करायला वेळ मिळणार नाही.