SA vs IND: इंडिया-दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप फायनलनंतर विस्फोटक फलंदाजाची निवृत्तीबाबत सोशल मीडिया पोस्ट, काय म्हणाला?

| Updated on: Jul 02, 2024 | 9:41 PM

Cricket Retirement: टी 20 वर्ल्ड कप फायनल 2024 नंतर विस्फोटक फलंदाजाने निवृत्तीबाबत सोशल मीडियाद्वारे सर्वकाही स्पष्ट केलं आहे.

SA vs IND: इंडिया-दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप फायनलनंतर विस्फोटक फलंदाजाची निवृत्तीबाबत सोशल मीडिया पोस्ट, काय म्हणाला?
sa vs ind
Image Credit source: BCCI
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला महाअंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना टफ फाईट दिली. हेन्रिक क्लासेन याने केलेल्या विस्फोटक अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. मात्र टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावावंर रोखलं आणि 7 धावांनी थरारक विजय मिळवला.

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. मात्र दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न भंग झालं. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेवर असलेला चोकर्स हा शिक्का आणखी पक्का झाला. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मैदानातच रडू लागले.हातातोडांशी आलेला विजयाचा घास दक्षिण आफ्रिकेने गमावला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं दुख सहन झालं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवानंतर त्यांचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र आता या निवृत्तिबाबत स्वत: मिलरनेच सांगितलं आहे. डेव्हिड मिलरने सोशल मीडियावरुन निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. मिलरने इंस्टाग्रामवर स्टोरीद्वारे निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. डेव्हिडने मी खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मिलरच्या निवृत्तिबाबतच्या सर्व चर्चा या चर्चाच ठरल्या आहेत.

डेव्हिड मिलर खेळत राहणार

दरम्यान टीम इंडियाच्या या वर्ल्ड कप विजयानंतर एकूण तिघांनी टी20I क्रिकेटला अलविदा केला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी निवृत्ती जाहीर केली. दरम्यान आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. सिकंदर रझा याच्याकडे झिंबाब्वेची सूत्र आहेत.