मुंबई: IPL प्रमाणे पुढच्यावर्षीपासून दक्षिण आफ्रिकेत T20 लीग स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेची तयारी सध्या जोरात सुरु आहे. या लीगमध्ये सहा फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. आयपीएलच्या संघ मालकांनीच दक्षिण आफ्रिकेत टीम विकत घेतल्या आहेत. आयपीएलप्रमाणे SA20 लीगमध्येही खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येतोय.
मार्को जॅनसेन कोणाकडून खेळणार?
यामुळे खेळाडू मालामाल होत आहेत. आयपीएल 2022 मध्ये मार्को जॅनसेन सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. दक्षिण आफ्रिकन लीगमध्येही जॅनसन याच फ्रेंचायजीकडून खेळतोय.
ट्रिस्टन स्टब्स महागडा खेळाडू
ट्रिस्टन स्टब्स या लीगमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला सनरायजर्स ईस्टर्न केपने 4.13 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मुंबई इंडियन्समध्ये स्टब्स आणि अर्जुन तेंडुलकर एकत्र खेळतात. रिली रुसौवरही मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करण्यात आली. तो दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 वर्ल्ड कप टीमचा भाग आहे.
हैदराबाद फ्रेंचायजीच नाव काय?
दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या टीम प्रिटोरिया कॅपिटल्सने रिली रुसौला 3.9 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. दक्षिण आफ्रिकन टी 20 लीगमध्ये हैदराबाद फ्रेंचायजीने आपल्या टीमच नाव सनरायजर्स ईस्टर्न केप ठेवलय. जॅनसनला या टीमने 2.73 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
दक्षिण आफ्रिकन प्लेयर्स या टीमकडून खेळणार
लुंगी एन्गिडी आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. दक्षिण आफ्रिकन टी 20 लीगमध्ये राजस्थान फ्रेंचायजीची टीम पार्ल रॉयल्ससाठी एन्गिडी खेळणार आहे. फ्रेंचायजीने त्याच्यासाठी 1.52 कोटी कोटी रुपये मोजले. तबरेज शम्सी सुद्धा पार्ल रॉयल्स टीममध्ये आहे. त्याच्यासाठी फ्रेंचायजीने 1.93 कोटी रुपये मोजले.
मुंबई इंडियन्सने कोणाला विकत घेतलं?
डवर्न सुपर जायंट्सने ड्वेन प्रिटोरियससाठी 1.83 कोटी रुपये खर्च केले. मुंबई इंडियन्सने रासी वॅन डर डुसेला 1.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. रीजा हेनड्रीक्सला जोबर्ग सुपर किंग्सने 2.02 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.