SA20 League: Dewald Brevis ने ठोकले SIX वर SIX, MI केपटाऊनचा मोठा विजय, VIDEO

| Updated on: Jan 11, 2023 | 9:27 AM

SA20 League: Mumbai Indians च्या डेवाल्ड ब्रेव्हिसचे हे सिक्स पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं कौतुक करुन थकणार नाही. एकदा VIDEO बघा.

SA20 League: Dewald Brevis ने ठोकले SIX वर SIX, MI केपटाऊनचा मोठा विजय, VIDEO
Dewald Brevis
Image Credit source: Screengrab
Follow us on

डरबन: क्रिकेट विश्वात बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Dewald Brevis ने कमाल केली आहे. त्याने SA20 League चा पहिला सामना खेळताना जबरदस्त बॅटिंग केली. त्याने मारलेले लांबलचक सिक्स पाहणं एक सुखद अनुभव होता. डेवाल्ड ब्रेव्हिसच कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. ब्रेव्हिसने एकापाठोपाठ एक जबरदस्त सिक्स मारले. त्याची बॅटिंग पाहून गोलंदाजांची दया आली.

IPL च्या धर्तीवर SA20 League

आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेने SA20 League स्पर्धा सुरु केलीय. आयपीएलमधल्या फ्रेंचायजींनीच SA20 League मध्ये टीम विकत घेतल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. साऊथ आफ्रिका टी 20 लीगमध्ये तो मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमकडून खेळतोय.

डेवाल्ड ब्रेव्हिसकडून गोलंदाजांची धुलाई

SA20 League मध्ये पार्ल रॉयल्स आणि मुंबई इंडियंस केपटाऊन टीममध्ये पहिला सामना झाला. दोन्ही IPL फ्रेंचायजींनी टीम विकत घेतली आहे. पार्ल रॉयल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 142 धावा केल्या होत्या. यात जॉस बटलरने 42 चेंडूत 51 धावा केल्या. पार्ल रॉयल्सने ज्या पीचवर फक्त 142 धावा केल्या, तिथचे मुंबई इंडियन्स केपटाऊनच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने गोलंदाजांची धुलाई केली.


ब्रेव्हिसन गोलंदाजांचा बँड वाजवला

143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MI केपटाऊनकडून डेवाल्ड ब्रेव्हिस ओपनिंगला उतरला होता. त्याच्या बॅटिंगने मैदानावरील दुश्यच बदललं. पार्ल रॉयल्सची बॅटिंग पाहून जे प्रेक्षक कंटाळले होते. त्यांना ब्रेव्हिसच्या आक्रमक फटकेबाजीने आनंद, समाधान दिलं.

एकापाठोपाठ एक 5 सिक्स

डेवाल्ड ब्रेव्हिसने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. काही चेंडूंना स्टेडियमच्या छपरावर पाठवलं. क्रिकेट चाहत्यांच ब्रेव्हिसच्या बॅटिंगमुळे भरपूर मनोरंजन झालं. ब्रेव्हिसने 41 चेंडूत नाबाद 70 धावा फटकावल्या. 170 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने त्याने या धावा केल्या. एका इनिंगमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकार मारले. मुंबई इंडियन्स केपटाऊनने 15.3 ओव्हर्समध्येच विजयी लक्ष्य गाठलं.