Sachin Tendulkar 50 th Birthday : क्रिकेट विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलं. वाढदिवशी सचिनला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक खास गिफ्ट केलय. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा सर डोनाल्ड ब्रॅडमन, एलन डेव्हीडसन आणि आर्थर मॉरीस या महान क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये समावेश झालाय. सिडनी क्रिकेट ग्राऊंडने सचिन-लाराचा सन्मान केलाय.
सचिनचा आज 50 वा वाढदिवस आणि ब्रायन लाराच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील 277 धावांच्या इनिंगला 30 वर्ष पूर्ण झालीत, त्या निमित्ताने सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या गेटला सचिन तेंडुलकर-ब्रायन लाराच नाव देण्यात आलय.
काय सन्मान दिला?
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर परदेशी क्रिकेटर्स लारा-तेंडुलकर द्वारातून मैदानात प्रवेश करतील. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम डॉन ब्रॅडमन गेटमधून मैदानात प्रवेश करते.
सचिन तेंडुलकर या सन्मानाबद्दल काय म्हणाला?
भारताबाहेर सिडनी क्रिकेट ग्राऊंड माझं आवडत मैदान असल्याच सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. “1991-92 सालच्या माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून SCG वर माझ्या काही सुंदर आठवणी आहेत. SCG वर येणाऱ्या सर्व परदेशी टीम्स माझ्या आणि ब्रायन लाराचं नाव असलेल्या गेटमधून मैदानात जाणार आहेत. हा खूप मोठा सन्मान आहे” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
ब्रायन लारा काय म्हणाला?
“SCG आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मी आभारी आहे. मी लवकरच सिडनी क्रिकेट ग्राऊंडला भेट देण्याचा प्रयत्न करीन” असं सचिनने म्हटलय. “सिडनी क्रिकेट ग्राऊंडने मला सन्मानित केलय. सचिनच्या मनातही तीच भावना असणार, याची मला खात्री आहे. या मैदानात माझ्या आणि कुटुंबाच्या काही खास आठवणी आहेत. ऑस्ट्रेलियात असताना नेहमीच मला इथे यायला आवडते” असं ब्रायन लारा म्हणाला.