मुंबई : क्रिकेटच्या महान फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरची गणना होते. आपल्या क्रिकेट करीयरमध्ये सचिन तेंडुलकरने अनेकदा दुखापतीचा सामना केलाय. त्यातून तो यशस्वीपणे बाहेर सुद्धा आलाय. अनेकदा सचिन वेदना होत असूनही खेळलाय. अशीच एक सीरीज सचिन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. सचिन तेंडुलकरने आता त्या सीरीजच्या आठवणी सांगितल्या आहेत. खूप त्रास होत असूनही सचिन त्या सीरीजमध्ये खेळला होता. 2010-11 ची गोष्ट आहे, जेव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती.
सचिन त्यावेळी पायाच्या दुखापतीने त्रस्त होता. सचिनला ही दुखापत सर्वप्रथम वर्ष 2000 मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजच्यावेळी पुन्हा या दुखापतीचा त्रास सुरु झाला. या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 4-0 ने हरवलं होतं.
बुटांच सोल दोनवेळा बदलेलं
सचिनने त्याच्यावर लिहिलेल्या एका मराठी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात याबद्दल खुलासा केला. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये असताना खूप त्रास होत होता. सचिनने या दुखापतीचा त्रास कमी करण्यासाठी बँडेज वापरली होती. बुटांच सोल दोनवेळा बदलल होतं. ऑस्ट्रेलियातील ग्राऊंडस टणक आहेत. त्यामुळे सचिनच्या अडचणी वाढल्या होत्या. डॉक्टर्सनी त्याला सर्जरीचा सल्ला दिला होता.
Celebrating golden years of golden boy of cricket ?@sachin_rt@100MasterBlastr#SachinTendulkar pic.twitter.com/AUHTcBq7aJ
— Bobby Yedida (@bobby_yedida) June 3, 2023
व्हीलचेयरवर बसाव लागलं असतं
धावताना जास्त त्रास व्हायचा असं सचिनने सांगितलं. त्यामुळे डॉक्टर्सनी त्याला सर्जरीचा सल्ला दिला होता. सचिनने या बद्दल पत्नी अंजलीला सांगितलं. आता वेदना सहन होत नाहीय, त्यामुळे सर्जरी करतोय असं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर अंजली लगेच ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघाली. सचिनने सर्जरी करु नये, यासाठी 48 तासांच्या आत ती ब्रिस्बेनमध्ये पोहोचली. सर्जरी अयशस्वी ठरली, तर त्याचे विपरित परिणाम होतील, याची डॉक्टरांनी सचिनला कल्पना दिली होती. सहा आठवड्यांसाठी व्हीलचेयरवर बसून रहाव लागलं असतं.