मुंबई : इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये पार पडलेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत अनेक अप्रतिम विजय मिळवलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागल्याने सर्वंच भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. दरम्यान भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या पराभवाचे कारण सांगितले असून त्याने ट्विट करत नेमकं भारतीय संघाचं नेमकं काय चूकलं हे सांगितलं आहे. (Sachin Tendulkar Tells The reason Why India Lost WTC Final after losing Virat Kohli Cheteshwar Pujara Wicket early)
सचिनने भारतीय संघातील फलंदाजाकडून चूक झाली असल्याचं सांगितल. फलंदाजानी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर संयमाने फलंदाजी करणं गरजेच होत. खास करुन विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी दिवसाची सुरुवात केल्यावर दोन ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानेच सामना भारताच्या हातातून निसटला असल्याचं सचिन म्हणाला.
ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर म्हटलाय की, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयाबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. तुमचा संघ अप्रतिम होता. भारतीय संघाने त्यांच्या कामगिरीने निराश केले. मी आधीच सांगितले होते की
सहाव्या दिवशीच्या पहिल्या 10 ओव्हर अत्यंत महत्त्वाच्या असून त्या कोहली आणि पुजाराने योग्यरित्या खेळण गरजेचं होतं. पण दोघेही अगदी 10 बॉल्सच्या फरकाने बाद झाले. ज्यामुळे संपूर्ण संघावर प्रेशर आले.’
Congrats @BLACKCAPS on winning the #WTC21. You were the superior team.#TeamIndia will be disappointed with their performance.
As I had mentioned the first 10 overs will be crucial & ?? lost both Kohli & Pujara in the space of 10 balls & that put a lot of pressure on the team. pic.twitter.com/YVwnRGJXXr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 23, 2021
(Sachin Tendulkar Tells The reason Why India Lost WTC Final after losing Virat Kohli Cheteshwar Pujara Wicket early)