मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. अजून त्यांना पहिला विजय मिळवता आलेला नाही. सलग पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईची टीम कठीण परिस्थितीचा सामना करत असली, तरी मुंबईच्या चाहत्यांनी मात्र अपेक्षा सोडलेली नाही. आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना सुरु आहे. सीसीआय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात विजय आवश्यक आहे. मुंबई इंडियन्सला चिअर करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज काही खास फॅन्स सामना पाहण्यासाठी पोहोचले आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. सचिन मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी जात असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. साराने मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केली आहे.
साराने कार मध्ये व्हिडिओ शूट केला. यामध्ये आई अंजली तिच्या शेजारी बसली आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केलाय. प्रेक्षक स्टँडमध्ये सारा आई सोबत दिसली. अर्जुन तेंडुलकर डगआऊटमध्ये वडिल सचिन तेंडुलकरसोबत बसला आहे. आज अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करु शकतो, अशी चर्चा होती.
याआधी सारा तेंडुलकरची एक कमेंट चर्चेत होती. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर साराने हार्टच्या इमोजीसोबत कमेंट केली होती. ही कमेंट व्हायरल झाली. आज अर्जुन तेंडुलकर डेब्यु करेल अशी चर्चा होती. पण असं घडलं नाही. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.