लंडन : सध्या श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर असून इंग्लंड आणि श्रीलंका (England vs Sri lanka) यांच्यात टी-20 सामने खेळवल जात आहेत. यामध्ये दूसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान इंग्लंडने श्रीलंकेवर 5 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेत देखील इंग्लंडने 2-0 ची आघाडी घेतली. दरम्यान शनिवारच्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा लियाम लिविंगस्टोन याला मॅन ऑफ द मॅचने सम्मानित करण्यात आलं असलं तरी चर्चा मात्र अष्टपैलू सॅम करनचीच (Sam Curran) आहे. सॅमने सामन्यात एका अप्रतिम फुटबॉल किकद्वारे श्रीलंकेच्या सलामीवीर गुणाथिलका याला बाद केलं. या रनआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामन्यात श्रीलंकेचे सलामीवीर अविष्का फर्नांडों आणि गुणाथिलका फलंदाजी करत होते. त्यावेळी अविष्काने एक बॉलला केवळ बॅट लावून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाच नॉनस्ट्राईकवर असणाऱ्या गुणाथिलका क्रिजमध्ये पोहचण्याआधी गोलंदाज सॅम करनने बॉलला फुटबॉलप्रमाणे किक मारत स्टंप उडवले आणि गुणाथिलका याला धावचीत केलं.
“It’s coming home!” ⚽
Back of the net, @CurranSM! ?
Scorecard/clips: https://t.co/pLmR4Sv6Mh pic.twitter.com/dx8gRiIFD7
— England Cricket (@englandcricket) June 24, 2021
या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत असून शेअर आणि लाईक करत आहेत. तसेच या रनआऊटवरुन मीम्स देखील बनू लागले असून इंग्लंडचे चाहते करनची तुलना दिग्गज फुटबॉलर्ससोबत करु लागले आहेत. काहीजण तर इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनची काय गरज सॅम करन असताना अशा मजेशीर कमेंटही करत आहेत.
Who needs Harry Kane when you’ve got Sam Curran! #ENGvSL
pic.twitter.com/z48mpc6bTA— ODDSbible (@ODDSbible) June 24, 2021
⚽️ EUROS NEWS ⚽️
⬅️ Sterling
➡️ S.CurranApart from Gareth’s new selection headache, in the cricket SL are struggling and 29-2 off 7 overs ?#ENGvSL pic.twitter.com/8RCGPXByKt
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) June 24, 2021
हे ही वाचा :
“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”
WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली
WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!
(Sam Curran Football Kick Runout In ENG vs SL T20 Match Video Went Viral)