Sania Mirza | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने मागच्या महिन्यात तिसर लग्न केलं. त्याचा दुसरा विवाह भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत झाला होता. त्याने 10 वर्षाच्या संसारानंतर सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. शोएब मलिकने कुटुंबीयांचा विरोध झुगारुन सना जावेदसोबत लग्न केलं. शोएब मलिकची ही कृती फक्त त्याच्या कुटुंबीयांनाच नाही, तर पाकिस्तानातही अनेकांना मान्य नाहीय. नुकताच पाकिस्तान सुपर लीग 2024 मध्ये याचा प्रत्यय आला. मुल्तानच्या क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी शोएबची पत्नी सना जावेदची खिल्ली उडवली. तिच्यासमोर सानिया मिर्झाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली.
PSL 2024 लीगचा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने हा व्हिडिओ बनवलाय. सना जावेद मैदानातील सीमारेषेजवळ फिरत होती. नवरा शोएब मलिकचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली सना स्पेशल व्हीआयपी सीटवर बसली होती. तिने काळ्या रंगाचा स्लीव्हसवाला टी-शर्ट आणि बॅगी जीन्स घातली होती. केस मोकळे सोडून खांद्याला हँडबॅग लावलेली होती.
चिडून पाहिलं व पुढे चालत राहिली
सना जावेद सीमा रेषेजवळून जात असताना स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षक सानिया मिर्झाच्या नावाने घोषणा देऊन तिला डिवचत होते. सनाने हे सर्व ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव दिसून आले. प्रेक्षकांकडे तिने चिडून पाहिलं व पुढे चालत राहिली.
It’s their prerogative, so there’s no need to taunt sana javed, every individual deserves respect, treating others poorly is unjustifiable#SanaJaved #ShoaibMalik pic.twitter.com/GHnBVhG23E
— Ashir (@wasmashr) February 20, 2024
मागच्या महिन्यात अचानक फोटो समोर आले
सना जावेदच पहिल लग्न अभिनेता, गायक उमर जस्वाल सोबत झालं होतं. 2020 मध्ये सना-उमरच लग्न झालं. 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शोएब मलिकशी लग्न केल्यानंतर सना जावेदने तिच्या इन्स्टा बायोमध्ये नाव बदललय. 2023 मध्ये शोएब मलिकने सना जावेदच्या बर्थ डे ला तिचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु आहे, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मागच्या महिन्यात अचानक शोएब मलिक-सना जावेदच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि अनेकांना धक्का बसला. शोएब मलिकच पहिल लग्न आयशा सिद्दीकी बरोबर झालं होतं. सानियाशी लग्न करण्यासाठी त्याने आयशापासून घटस्फोट घेतला.