Sandeep Lamichhane Rape Case: नेपाळचा स्टार क्रिकेटर आणि माजी कॅप्टन संदीप लामिछानेवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संदीप कॅरेबियाई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना, एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. नेपाळच्या न्यायालयाने आता बलात्काराचा आरोप असलेल्या संदीप लामिछानेची जामिनावर सुटका केली आहे.
कधी झाली होती अटक?
8 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळच्या न्यायालयाने इंटरनॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन संदीप लामिछानेच्या अटकेच वॉरंट जारी केलं होतं. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काठमांडू येथील हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पाटन उच्च न्यायालयाने 20 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर लामिछानेची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. लामिछानेला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती.
3 महिने होता तुरुंगात
न्यायाधीश ध्रुवराज नंदा आणि रमेश धाकल यांच्या संयुक्त पीठाने पूर्व आयपीएल प्लेयर लामिछानेची 20 लाख रुपयाच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांनी काठमांडू जिल्हा न्यायालयाचा आदेश पलटला. पीडित अल्पवयीन मुलीने पाच सप्टेंबरला पोलीस ठाण्यात संदीप लामिछानेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. तिने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर लामिछानेला जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.
“चौकशीच्या प्रत्येक टप्प्यात पूर्ण सहकार्य करीन. स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन” असं लामिछानने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. संदीप लामिछानेला अटक झाली. अंतिम आदेश येईपर्यंत संदीप लामिछानेला देशाबाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. लेग स्पिनर संदीप लामिछाने नेपाळचा सर्वात मोठा हाफ प्रोफाइल क्रिकेटर आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा तो पहिला क्रिकेटर आहे. 2018 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून डेब्यु केला होता.