दुबई: पाकिस्तान (Pakistan) संघाच्या पराभवामुळे त्यांचे फॅन्स खूप निराश आणि रागात आहेत. सलग 5 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतरही महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात दिल्यामुळे पाकचं विश्वविजेता बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. पण पाकच्या पराभावानंतर भारतात टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ट्रोल होत आहे. यामागे एक नेमकं काय कारण आहे, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) सोबत लग्न केलं आहे. शोएबही यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघात होता. त्यामुळे त्याला चीयर करण्यासाठी सानिया युएईला गेली होती. ती पाकच्या सामन्यांवेळीही मैदानात होती. दरम्यान गुरुवारी देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सानिया मैदानात होती. त्यामुळे भारतीय असतानाही कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी सानिया मैदानात जात असल्याने भारतीय फॅन्सनी तिला ट्रोल केलं आहे.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी पाक संघासाठी चीयर करताना सानिया दिसली त्यामुळे भारतीय फॅन्स नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियाद्वारे व्यक्तही केली. काहींनी सानियाला ट्रोल करत तिला पाकिस्तानातच कायम जा अशीही कमेंट केली आहे. विशेष म्हणजे सानिया भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही मैदानात आली नव्हती.
#PAKvAUS
Can someone please tell me that what kind of an indian Sania Mirza is??Never have i ever saw her cheating for indian cricket team but we saw her in support of pakistan many times.
Ex.? pic.twitter.com/uVDnVpBVq6
— Abhishek Narsingh ॐ ?? (@AmanPradyuman) November 11, 2021
177 धावांचे खमके आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार शून्यावर बाद झाला. ज्यानंतर वॉर्नर आणि मार्शने सामना सांभाळण्याचा प्रय्तन केला पण मार्श 28 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर स्मिथ, मॅक्सेव 5,7 धावा करुन बाद झाले. त्याच काही ओव्हर्समध्ये सामना सांभाळणारा वॉर्नरी 49 धावा करुन बाद झाला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मात्र क्रिजवर आलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी आणि एक ओव्हर राखून विजय मिळवून दिला. शाहीन आफ्रिदीच्या 19 व्या षटकात वेडने लागोपाठ 3 सिक्स मारुन सामना जिंकवला. यावेळी मार्कसने नाबाद 40 आणि मॅथ्यूने नाबाद 41 धावांची खेळी केली.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास
IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण
(Sania Mirza clapping for Pakistan indian Fans angrys says her go to pakistan)