Ind vs Pak : गरज संपली, KL Rahul येताच ‘हा’ खेळाडू निघाला श्रीलंकेतून

| Updated on: Sep 09, 2023 | 9:42 AM

Ind vs Pak : बॅग भरुन श्रीलंकेतून निघालेल्या या प्लेयरला आता पुन्हा कधी टीम इंडियात संधी मिळणार नाही का?. स्ँटड बाय प्लेयर म्हणून हा खेळाडू टीमसोबत गेला होता. केएल राहुल आता फिट झाला आहे. मागचे काही महिने तो दुखापतीने त्रस्त होता.

Ind vs Pak : गरज संपली, KL Rahul येताच हा खेळाडू निघाला श्रीलंकेतून
K L Rahul Asia cup 2023
Image Credit source: PTI
Follow us on

कोंलबो : आशिया कप टुर्नामेंटमध्ये उद्या 10 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे. या मॅचआधी केएल राहुल टीममध्ये दाखल झाला आहे. सध्या सुपर-4 राऊंड सुरु आहे. केएल राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी दिली जाऊ शकते. इशान किशनही टीम इंडियामध्ये आहे. तो सुद्धा विकेटकिपिंग करतो. केएल राहुल मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त होता. आता त्याने त्याचा फिटनेस परत मिळवला आहे. पुढच्या महिन्यात वनडे वर्ल्ड कप सुरु होणार आहे. यंदा भारताकडे यजमानपद आहे. वर्ल्ड कपसाठी नुकतीच टीम जाहीर करण्यात आली. त्यात के एल राहुलचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. या मॅचआधी गुरुवारी टीम इंडियाने जोरदार सराव केला. त्यामध्ये केएल राहुलने फलंदाजीचा सराव केला.

पाकिस्तानकडे चांगल्या क्वालिटीचे वेगवान गोलंदाज आहेत. राहुलने हीच बाब ध्यानात घेऊन जास्तीत जास्तवेळ नेट्समध्ये घालवला. केएल राहुल टीममध्ये परतल्याने टीम सोबत रिझर्व्ह खेळाडू म्हणून गेलेल्या संजू सॅमसनला रिलीज करण्यात आलय. म्हणजे त्याला मोकळं करण्यात आलय. केएल राहुलच्या जागी स्टँडबाय प्लेर म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली होती. पण केएल राहुल स्कवाडमध्ये परतल्याने सॅमसनला रिलीज करण्यात आलय. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आता मायदेशी परतणार आहे. संजू सॅमसन सुद्धा विकेटकिपर फलंदाज आहे. पण त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. सॅमसनच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवट झालाय का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

काय धडा घेतला ते आता समजेल?

मागच्या आठवड्यात ग्रुप स्टेजमधील भारत-पाकिस्तान पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 48.5 ओव्हर्समध्ये 266 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याने 87 आणि इशान किशनने 82 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये टीम इंडियाला संघर्ष करावा लागला होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीचा सामना करताना अडचणी आल्या होत्या. टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली होती. आता पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मागच्या चुकांमधून काय धडा घेतला ते समजेल.