मुंबई : अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) याने आयपीएलमध्ये अखेर 3 वर्षानंतर मुंबई इंडियन्सकडून (MI) पदार्पण ( Arjun tendulkar ipl debut ) केले आहे. जगातील दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात केकेआर विरुद्ध ( MI vs KKR Live ) खेळल्या जात असलेल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुन तेंडुलकर 3 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता. अर्जुन तेंडुलकर 3 वर्षापासून मुंबई इंडियन्सचा भाग होता, परंतु त्याला अद्याप पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.
अर्जुन तेंडुलकरला आज केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर यांनी मुंबई इंडियन्सला अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाचे विजय मिळवून दिले, परंतु त्याचे आणखी एक स्वप्न आज पूर्ण झाले आहे. सचिनचा मुलगा अर्जुनचा मुंबई इंडियन्सने प्रथमच प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. 2021 मध्ये पहिल्यांदा अर्जुनला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्याला 25 लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट करण्यात आले होते.
अर्जुनला त्याच्या डेब्यु सामन्यात सपोर्ट करण्यासाठी अनेक मंडळी उपस्थित आहेत. पण सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती असलेले त्याचे वडील सचिन तेंडुलकर आणि बहीण सारा तेंडुलकरही मैदानावर पोहोचले आहेत. सारा आनंदाने भावाला सपोर्ट करताना दिसत आहे.
?????!
A special first and a moment to remember ? #MIvKKR | @mipaltan
Relive Arjun Tendulkar’s first over in #TATAIPL ??https://t.co/nrNGj6iWXl
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
अर्जुन तेंडुलकरने प्रथमच गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम श्रेणीमध्ये त्याने एकूण 7 सामने खेळले आणि 547 धावा आणि 12 विकेट घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्जुनने 7 सामन्यात एकूण 259 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने पहिल्यांदा 2021 मध्ये हरियाणा विरुद्ध T20 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आता एकूण 9 सामन्यात 198 धावा आणि 12 विकेट घेतले आहेत.
अर्जुन तेंडुलकर आपल्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. त्याला देखील आपला डेब्यु सामना स्मरणात राहिल असा करण्याची इच्छा असेल. बॉलिंग आणि बॅटींग करताना त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.