मुंबई: टीम इंडियाच्या (Team india) भरवाशाच्या खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) समावेश होतो. सध्या तो टीम इंडियाचा स्टार प्लेयर आहे. सूर्या टीमचा मुख्य आधारस्तंभ बनला आहे. टीमला गरज असताना त्याने निराश केलेलं नाही. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहेत. कठीण परिस्थिती, दबावाच्या सिच्युएशनमध्ये सूर्याचा खेळ अधिक बहरतो. त्याच्या याच गुणांमुळे आज तो टीम इंडियातील लोकप्रिय क्रिकेटपटू (Cricketer) बनला आहे.
टीम इंडियाचे दरवाजे उघडले
सूर्यकुमार यादव टीम इंडियात येण्याआधी मुंबईकडून क्रिकेट खेळायचा. मुंबई क्रिकेटमध्ये त्याने नाव कमावलं. त्यानंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. सूर्यकुमार यादवच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सहकारी खेळाडूंच सुद्धा तितकच मोकळेपणाने कौतुक करतो. सूर्याने त्याच्या या स्वभावानेच अनेकांना जिंकून घेतलं आहे.
कामगिरी सुद्धा तशीच खास
सूर्याने मुंबईच्या एका युवा क्रिकेटपटूच तोंडभरुन कौतुक केलं आहे. या क्रिकेटपटूची कामगिरी सुद्धा तशीच खास आहे. त्याचं नाव आहे सर्फराज खान. 2021/22 च्या रणजी सीजनमध्ये सर्फराजने खोऱ्याने धावा केल्या. रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्फराज टॉपवर होता.
इराणी कपमध्येही फॉर्म कायम
त्याचा हाच फॉर्म इराणी कप स्पर्धेतही कायम आहे. 24 वर्षाच्या सर्फराजने शनिवारी रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना सौराष्ट्राविरुद्ध 92 चेंडूत शतक झळकावलं. रविवारी तो बाद झाला. सर्फराजने 178 चेंडूत 138 धावा केल्या.
सर्फराजला तोड नाहीय
या खेळीबद्दल सर्फराज खानच चहूबाजूंनी कौतुक होतय. स्थानिक क्रिकेटमध्ये आज सर्फराजला तोड नाहीय. सूर्यकुमार यादव देखील सर्फराजच्या खेळाने प्रभावित झाला आहे. मुंबईचा माजी कॅप्टन आणि जागतिक टी 20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या सूर्युकमार यादवने ‘तुझा खूप खूप अभिमान वाटतो’, अशा शब्दात सर्फराजन खानच कौतुक केलय.
So so so Proud of you? pic.twitter.com/aHtT20LeQY
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) October 1, 2022
सर्फराजच्या कामगिरीवर एक नजर
सूर्यकुमारच्याच नेतृत्वाखाली सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून पदार्पण केलं होतं. 2014 च्या सीजनमध्ये सूर्यकुमार मुंबईचा कॅप्टन होता. मागच्या रणजी सीजनमध्ये सर्फराज खानने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने सहा सामन्यात 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. यात चार शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.