IND vs AUS: टीम इंडिया पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी 13 जानेवारीला टीम जाहीर करण्यात आली. मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या दोन टेस्टसाठी टीम निवडण्यात आली. टीम निवडताना एका बॅट्समनला त्याच्या निवडीची भरपूर अपेक्षा होती. टीममध्ये स्थान मिळेल, असं त्याला वाटलं होतं. पण त्याच्या पदरी निराशा आली. या बॅट्समनच नाव आहे, सर्फराज खान. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या या युवा प्लेयरने खोऱ्याने धावा केल्या आहेत.
मनातली खंत बोलून दाखवली
टीममध्ये निवड न झाल्यान सर्फराज खानने दु:ख व्यक्त केलं. तुला लवकरच चांगले दिवस येतील, असं सिलेक्टर्सनी आपल्याला सांगितलं होतं. पण चांगल खेळूनही टीममध्ये स्थान मिळालं नाही, अशी खंत सर्फराजने बोलून दाखवली.
सिलेक्टर काय म्हणाले?
मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी मला सांगितलं होतं की, थोडी वाट पाहा, तुला लवकरच संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी निवड झाली नाही. त्याबद्दल त्याने नाराजी प्रगट केली. सर्फराज खानच्या जागी सूर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान मिळालं.
सिलेक्टर बरोबर कुठल्या हॉटेलमध्ये भेट झाली?
टीम जाहीर झाल्यानंतर मी एकटा पडलो होतो. खूप रडलो. सिलेक्टर्सकडून आश्वासन मिळाल्यावरही माझं सिलेक्शन झालं नाही, याचं दु:ख झालं. मुंबईच्या हॉटेलमध्ये चेतन शर्मा यांच्याबरोबर भेट झाल्याच सर्फराजने सांगितलं. निराश होऊ नको, तुला संधी मिळेल, असं चेतन शर्मा म्हणाले होते.
फर्स्ट क्लासमध्ये किती धावा केल्या?
चेतन शर्मा यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर एक शानदार इनिंग खेळल्याच सर्फराज खान म्हणाले. पण तरीही संधी मिळाली नाही. सर्फराज खानने 36 फर्स्ट क्लास सामन्यात 80.47 च्या सरासरीने 3380 धावा केल्या.
रात्रभर झोपू शकलो नाही
“आसाम विरुद्ध रणजी मॅच खेळून मी दिल्लीला आलो. संपूर्ण रात्रभर झोपू शकलो नाही. मी स्वत:लाच विचारत होतो, मी त्या स्क्वॉडमध्ये का नाहीय? वडिलांशी बोलल्यानंतर आता मी ओके आहे” असं सर्फराज खान इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला. तीन सीजनमध्ये सर्फराजने 2 हजारपेक्षा जास्त धावा आणि शतक झळकावली आहेत.