डरबन: सध्या दक्षिण आफ्रिकेत आक्रमक T20 क्रिकेट पहायला मिळतय. फॅन्सना अपेक्षित क्रिकेट सामने पहायला मिळतायत. एका 24 वर्षाच्या युवा बॅट्समनने गोलंदाजांना अक्षरक्ष: कुटलं. त्याने गोलंदाजांची दुर्दशा केली. SA 20 लीगमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या बॅट्समनच नाव आहे, विल जॅक्स. इंग्लंडच्या या तुफानी बॅट्समनच नाव IPL 2023 मध्येही ऐकू येणार आहे. या बॅट्समनला विकत घेण्यासाठी दोन फ्रेंचायजी भिडल्या होत्या. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली.
IPL 2023 आधीच केली कमाल
IPL 2023 च्या ऑक्शनमध्ये विल जॅक्सची बेस प्राइस 1.50 कोटी रुपये होती. त्याला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला. अखेर RCB ने 3.20 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं. IPL 2023 मध्ये उतरण्याआधी SA20 लीगमध्ये या प्लेयरची कामगिरी जाणून घ्या.
200 च्या स्ट्राइक रेटने बॉलर्सना धुतलं
प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायजर्स इस्टर्न कॅप दरम्यान सामना झाला. या मॅचमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्ससाठी विल जॅक्सने ओपन केलं. त्याने तुफानी बॅटिंग केली. विलने 200 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. फक्त 8 धावांमुळे त्याच दुसरं T20 शतक हुकलं.
THEN THERE ARE 3‼️ Centurion has come to play as we have our 3rd #Betway Catch a Million entrant!!!#PCvSEC #Betway #SA20 | @Betway_India pic.twitter.com/hUP2g8hosc
— Betway SA20 (@SA20_League) January 14, 2023
RCB ने कोट्यधीश बनवलेल्या खेळाडूने कुटल्या 92 धावा
विल जॅक्सने सनरायजर्स इस्टर्न कॅपच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 46 बॉलमध्ये 92 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने फोर कमी सिक्स जास्त मारले. आपल्या स्फोटक इनिंग दरम्यान त्याने 8 सिक्स आणि 7 फोर मारले. त्याच्या स्फोटक बॅटिंगमुळे प्रिटोरिया कॅपिटल्सने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 216 धावा केल्या.
37 रन्सनी मिळाला विजय
सनरायजर्स इस्टर्न कॅपसमोर विजयासाठी 217 धावांच टार्गेट होतं. सनरायजर्स टीमने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 179 धावा केल्या. प्रिटोरिया कॅपिटल्सकडून वेन पर्नेल आणि आदिल रशीदने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. प्रिटोरिया कॅपिटल्सचा टुर्नामेंटमधील हा सलग दुसरा विजय आहे. विल जॅक्सला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्रकार मिळाला.