Arjun Tendulkar च्या एक पाऊल पुढे निघून गेला हा प्लेयर, डेब्युमध्येच ठोकली डबल सेंच्युरी

| Updated on: Dec 15, 2022 | 1:15 PM

कोण आहे हा युवा स्टार?

Arjun Tendulkar च्या एक पाऊल पुढे निघून गेला हा प्लेयर, डेब्युमध्येच ठोकली डबल सेंच्युरी
Jay gohil
Image Credit source: Twitter
Follow us on

अहमदाबाद: अर्जुन तेंडुलकरने रणजी डेब्युमध्ये ठोकलेल्या शतकाची सर्वत्र चर्चा आहे. त्याचवेळी आणखी एका युवा खेळाडूने आपल्या पहिल्याच डेब्यु मॅचमध्ये कमाल केलीय. या खेळाडूच नाव आहे, जय गोहिल. सौराष्ट्राच्या या फलंदाजाने रणजी डेब्युमध्येच आसाम विरुद्ध द्विशतक झळकावलं.

याआधी कुठल्या खेळाडूंनी अशी कामगिरी केलीय?

जय गोहिलने आसामच्या एसीए स्टेडियममध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने 246 चेंडूत 227 धावा फटकावल्या. त्याने 216 चेंडूत आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली. डेब्यु रणजी सामन्यात शतक झळकवणारा जय गोहिल सौराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. जय गोहिलच्या आधी 12 खेळाडूंनी असा कारनामा केलाय. यात अमोल मजूमदार, गुंडप्पा विश्वानाथ यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत.

पुढचा सुपरस्टार म्हणतायत

जय गोहिलशिवाय हार्विक देसाई शानदार 108 धावांची इनिंग खेळला. सौराष्ट्राने आपला पहिला डाव 487 धावांवर घोषित केला. जय गोहिलला सौराष्ट्राचा पुढचा सुपरस्टार म्हटलं जातय. कॅप्टन जयदेव उनाडकटला सुद्धा त्याचं महत्त्व लक्षात आलय. जय गोहिलने आतापर्यंत 3 लिस्ट ए सामन्यात 95 धावा केल्यात. 8 T20 सामन्यात त्याने फक्त 60 धावा केल्यात.