T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

| Updated on: Oct 22, 2021 | 9:55 PM

टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने ओमान संघाला 8 विकेट्सनी मात देत पुढील फेरी गाठली आहे. सुपर 12 मध्ये त्यांनी भारत असलेल्या ग्रुपमध्येच स्थान मिळवलं आहे.

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी
स्कॉटलंडचा संघ
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) सामने अगदी चुरशीत  सुरु आहेत.  ग्रुप स्टेजेसचे सामने संपत आले असून जवळपास सर्व पुढील फेरीत जाणारे संघ समोर आले आहेत. बांग्लादेश पाठोपाठ आज (21 ऑक्टोबर) स्कॉटलंड संघाने देखील सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे. स्कॉटलंड संघाने ओमानला 8 विकेट्सने नमवत पुढील फेरीत स्थान मिळवलं आहे. आता स्कॉचलंडचा संघ भारत असणाऱ्या गटात गेला असून भारतासोबतही त्यांचा एक सामना असणार आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघ आहेत.

आजच्या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत ओमान संघाने फलंदाजी निवडली. पण स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत ओमान संघाच्या फलंदाजना सळो की पळो करुन सोडलं. सलामीवीर अकिब इलियास (37), जिशान मकसूद (34) आणि मोहम्मद नदीम (24) यांच्याशिवाय इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही न गाठता आल्याने त्यांचा संघ 122 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे स्कॉटलंडसमोर विजयासाठी 123 धावांचे सोपे आव्हान होते.

स्कॉटलंडचा 8 गडी राखून विजय

123 धावांचे सोपे आव्हान स्कॉटलंडने केवळ 2 विकेट्सच्या बदल्या 17 ओव्हरमध्येच पूर्ण केले. त्यांचे सलामीवीर जियॉर्जी मुनसे (20) आणि कायल कोटजर (41) यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ते दोघेही बाद होताच मॅथ्यू क्रॉस आणि रिची बॅरिंगटन यांनी अनुक्रमे नाबाद 26 आणि नाबाद 31 धावा करत संघाचा विजय पक्का केला. आता सुपर 12 मधील स्कॉटलंडचा सामना 27 ऑक्टोबर रोजी असणार आहे. हा सामना ग्रुप स्टेजमधून 27 ऑक्टोबर रोजी सुपर 12 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघाशी असेल. तर 5 नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडचा सामना भारताशी असेल.

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(Scotland beat oman by 8 Wickets and enters in Super12 in team india group)