कॅप्टल कूल धोनीच्या फार्म हाऊस म्हणजे छोटं गावच, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अधिककाळ आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून येतो. त्याची पत्नी साक्षी त्यांचे आणि घराचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते.
1 / 5
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागच्या वर्षी विश्वचषकातील अखेरच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सध्या तो आयपीएलमुळे दुबईत आहे. अन्यथा तो अधिककाळ त्याच्या फार्महाऊसवर फॅमिलीसोबत वेळ घालवत असतो.
2 / 5
धोनीचं फार्म हाऊस हे रांचीजवळ असून तब्बल 7 एकरच्या परिसरात हे फार्महाऊस आहे. त्याच्या फार्महाऊसच नाव 'कैलाशपति' असं आहे. या फार्महाऊसवर बऱ्याच प्रकारची झाड आहेत. ज्यात फळांपासून ते भाज्यांपर्यंत सारंच आहे.
3 / 5
धोनीची पत्नी साक्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फार्म हाऊसचे बरेच फोटो टाकते. ज्यात धोनी त्याची मुलगी जीवा तसेच त्यांचे पाळीव प्राणीही असतात.
4 / 5
धोनी हा बाईक्सचा खूप शौकीन असल्याचं साऱ्यानांच माहित आहे. त्यामुळे त्याच्या फार्महाऊसवरीही अनेक बाईक्स असून त्यासाठी वेगळं पार्किंग आहे.
5 / 5
धोनीच्या या फार्महाऊसवर विविध प्रकारचे कुत्रे, गायी, घोडे अशा प्रकारचे पाळीव प्राणी आहेत. काही फळांची झाडंही या ठिकाणी आहेत.