मुंबई : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावेळी एका सहाव्या गोलंदाजाची कमी भारताला अगदी प्रकर्षाने जाणवली. दरम्यान संघात ही जबाबदारी असणारा हार्दिंक गोलंदाजी न करु शकल्याने अशी परिस्थिती आली होती. हार्दिक पांड्याने गोलंदाजी न करणे हा भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय आहे. आयपीएलच्या या मोसमात त्याने गोलंदाजी केली नाही. याचे कारण त्याच्या पाठीला झालेली दुखापत आहे. यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता आणि त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने चेंडूला हात लावला नाही. पांड्या नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला असला तरी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करेल की नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. (Selectors wanted to send Hardik Pandya back home but MS Dhoni supported him : Report)
भारतीय निवड समितीने जेव्हा T20 विश्वचषक-2021 साठी संघाची निवड केली तेव्हा पंड्याला अष्टपैलू म्हणून निवडण्यात आले होते, परंतु त्यानंतर या खेळाडूने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. पंड्याचा IPL-2021 चा फॉर्म पाहून निवडकर्त्यांनी त्याला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मेंटर म्हणून नियुक्त झालेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS धोनी) असे होऊ दिले नाही.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात याबाबत खुलासा केला आहे. वृत्तपत्राने सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, धोनीने पंड्याला त्याच्या फिनिशिंग क्षमतेमुळे रोखले. वृत्तपत्राने आपल्या अहवालात लिहिले आहे की, “सत्य हे आहे की जेव्हा त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नव्हती, तेव्हा निवडकर्त्यांना त्याला भारतात परत पाठवायचे होते, परंतु एमएस धोनीने त्याच्या मॅच फिनिशिंग क्षमतेचे समर्थन केले.”
भारताचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावस्कर यांनी स्पष्टपणे सांगितले की, हार्दिकने गोलंदाजी केली तर ठिक नाहीतर त्याला संघात स्थान देण्यात काही अर्थ नाही. पंड्याच्या जागी इशान किशनला संधी देण्याचा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एका बदलाकडे गावस्कर यांनी लक्ष वेधले आहे.
स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत गावसकर स्पष्टपणे म्हणाले की, “जर हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तर मी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी इशान किशनची निवड करेन. याशिवाय मला भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान द्यायला आवडेल. संघात दोनपेक्षा अधिक बदल केले तर विरोधी संघाला तुम्ही बॅकफुटवर आहात, असा संदेश जाईल.
हार्दीक पंड्याला गोलंदाजी करताना कमरेत त्रास होत होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार सरावादरम्यान गोलंदाजी करताना त्याला हा त्रास होत नसल्याने तो आगामी सामन्यात नक्कीच गोलंदाजी करु शकेल. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोत हार्दीक गोलंदाजीसह फलंदाजीही करत आहे. त्यामुळे पाकविरुद्ध मोठी धावसंख्या न करु शकलेला पंड्या न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?
T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय
दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर
(Selectors wanted to send Hardik Pandya back home but MS Dhoni supported him : Report)