मेलबर्न: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. ज्या टीमचे प्लेयर जास्त कॅचेस पकडतात, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असते. बिग बॅश लीग 2022 च्या एका मॅचमध्ये पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादाब खानने हे करुन दाखवलं. या लेग स्पिन गोलंदाजाने 19 व्या ओव्हरमध्ये कमलीची गोलंदाजी करुन शानदार कॅच पकडली. शादाबच्या या कॅचने संपूर्ण मॅचच पलटली. त्याची टीम होबार्ट हरीकेन्सने 8 रन्सची मॅच जिंकली. होबार्टने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात पर्थच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 164 धावा केल्या.
यशस्वी गोलंदाज कोण?
पॅट्रिक डुले होबार्ट हरीकेन्सचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 16 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. शादाबने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 22 धावा देऊन एक विकेट घेतला. दबावाच्या प्रसंगात या खेळाडूने कमालीची गोलंदाजी आणि फिल्डिंग केली.
कशी होती शादाबची ओव्हर?
कॅप्टन मॅथ्यू वेडने शादाब खानला 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आणलं. शादाब गोलंदाजीसाठी आला, त्यावेळी पर्थला विजयासाठी 18 धावांची गरज होती. शादाबने पहिल्या चेंडूवर एक रन्स दिला. दुसरा चेंडू डॉट होता. तिसऱ्या चेंडूवर त्याने हार्डीची कमालीची कॅच पकडली. शादाबने डाइव्ह मारुन झेल पकडला. या ओव्हरमध्ये शादाबने फक्त 4 रन्स दिले. लास्ट ओव्हर्समध्ये पर्थला विजयासाठी 14 धावांची गरज होती.
SHADAB KHAN!
That is fully horizontal. Scorchers need 14 from the final over #BBL12 pic.twitter.com/lCd2Av824h
— KFC Big Bash League (@BBL) December 19, 2022
पर्थची खराब फलंदाजी
पर्थच्या टीमने मागच्यावर्षी विजेतेपद मिळवलं होतं. नाथन एलिसच्या ओव्हरमध्ये त्यांनी विशेष काही केलं नाही. झाय रिचर्डसन आणि एंड्रयू टायने या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा केल्या. परिणामी पर्थच्या टीमने ही मॅच गमावली. होबार्टसाठी कॅप्टन मॅथ्यू वेडने 29 चेंडूत 51 धावा ठोकल्या. टिम डेविडने 28 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. शादाब खानने 22 रन्स केल्या. होबार्ट हीरकेन्सने सीजनमधील पहिला विजय मिळवला.