ICC WWC 2022: म्हणून मिताली राजने आजच्या सामन्यात शेफाली वर्माला बसवलं बाहेर

| Updated on: Mar 10, 2022 | 11:27 AM

ICC WWC 2022: न्यूझीलंडमध्ये महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC WWC 2022) सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला.

ICC WWC 2022: म्हणून मिताली राजने आजच्या सामन्यात शेफाली वर्माला बसवलं बाहेर
मिताली राज भारतीय महिला संघ कर्णधार
Image Credit source: All Photos Instagram
Follow us on

हॅमिल्टन: न्यूझीलंडमध्ये महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC WWC 2022) सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. आज न्यूझीलंड विरुद्ध भारतीय महिला संघ आपला दुसरा सामना खेळतोय. आजच्या सामन्यासाठी कॅप्टन मिताली राजने (Mithali Raj) संघात एक मोठा बदल केला आहे. टीम मॅनेजमेंटने सलामीवीर शेफाली वर्माला (shafali verma) संघातून वगळलं आहे. 18 वर्षांची शेफाली जबरदस्त खेळाडू आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती खराब फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिला भोपळाही फोडता आला नव्हता. याची किंमत तिला आजच्या सामन्यात चुकवावी लागली. शेफाली सध्या प्रचंड खराब फॉर्मचा सामना करत आहे. मागच्या पाच सामन्यात तीनवेळा ती शून्यावर बाद झाली आहे. एक सामन्यात तिने नऊ धावा केल्या होत्या. हे सर्व सामने परदेशात खेळण्यात आले.

म्हणून बाहेर बसवलं

पाच सामने खेळण्याआधी तिने एक अर्धशतक झळकावले होते. न्यूझीलंड विरुद्ध क्विन्सटाऊनमध्ये 51 धावांची खेळी केली होती. शेफाली मागच्या दहा सामन्यांपैकी आठ वनडे आणि दोन टी 20 सामने खेळली आहे. तिने एकूण 136 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यापासून तिच्या खराब फॉर्मची सुरुवात झाली होती. त्यामुळे अखेर तिला आज बाहेर बसवण्यात आलं.

भारताला विजयासाठी 261 धावांचे लक्ष्य

न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये सामना सुरु आहे. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात नऊ बाद 260 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून अमेलिया कार आणि एमीने शानदार खेळ दाखवला. कारने (50) तर एमीने (75) धावा केल्या. त्याशिवाय कॅटि मार्टिनच्या (41) आणि सोफिया डिवाइनच्या (35) धावा काढून चांगली साथ दिली. भारतासमोर आता विजयासाठी 261 धावांचे लक्ष्य आहे.