आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने होम पीच इडन गार्डन्सवर जबरदस्त फलंदाजीच प्रदर्शन केलं. आंद्रे रसेलने स्फोटक बॅटिंग केली, ज्यासाठी तो ओळखला जातो. रसेलने गोलंदाजांना धोपटून काढत सिक्सचा पाऊस पाडला. रसेलने त्याच्या बॅटिंगने केकेआरच्या फॅन्सना जिंकलच पण टीमचा मालक शाहरुख खानही आनंदात होता. पण या दरम्यान शाहरुखच्या एका कृतीवरुन आता वाद निर्माण झालाय. आयपीएलचा नवीन सीजन सुरु झालाय. टीमचा पहिला सामना होम ग्राऊंड इडन गार्डन्सवर झाला. ही मॅच पाहण्यासाठी शाहरुख खान उपस्थित होता. शाहरुखला पाहून कोलकाताच्या फॅन्सना भरपूर जोश आला होता. ते शाहरुखच्या नावाने घोषणाबाजी करत होते.
शाहरुखने सुद्धा आपल्या चाहत्यांबद्दल प्रेम व्यक्त केलं. नेहमीच्या स्टाइलमध्ये चाहत्यांच्या दिशेने हात उंचावून अभिवादन केलं. फ्लाइंग किस दिली. शाहरुखने टीमच्या बॅटिंगचा सुद्धा आनंद घेतला. अचानक या दरम्यान शाहरुख सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. शाहरुखला स्मोकिंगची सवय आहे. इडन गार्डन्सवर सुद्धा तो या सवयीवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. कोलकाताच्या इनिंग दरम्यान शाहरुख स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसून मॅचचा आनंद घेत होता. या दरम्यान तो सिगारेट पिताना दिसला.
हे फोटो व्हायरल झाले
टीव्ही स्क्रिनवर शाहरुखच्या स्मोकिंगच दृश्य दिसताच सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. अनेक यूजर्सनी शाहरुखला भरपूर सुनावलं. आजच्या युवकांसाठी यातून चुकीचा संदेश जातोय, असं काही युजर्सनी म्हटलं.
Corporate star #ShahRukhKhan was spotted smoking on live television during #KKRvSRH tonight. Shame on him, idk how someone can idolise a chain smoker like him.https://t.co/DI3EUtgYAP
— 𝙍𝙤𝙢𝙚𝙤 (@iromeostark) March 23, 2024
Wow what a scene king khan smoking cigarette 🚬
He is the ideal of many people. 🙌#ShahRukhKhan #IPL2024 #KKRvsSRH pic.twitter.com/UlUr40fg9a
— Shivam Tripathi¹ ✗ 💥 (@iamshivam222) March 23, 2024
#SRK full form = Smoke Rukh Khan 🚬
Youth Cough Idol LoL 😷#ShahRukhKhan #KKRvsSRH https://t.co/fp5h58YNN5
— M A 𝕏 A L U 🗡️ (@YourMasalu) March 23, 2024
आयपीएलमधल्या वादांशी शाहरुखच जुन नात
आययपीएलमधल्या वादांशी शाहरुख खानच जुन नात आहे. आयपीएल सामना सुरु असताना, स्टेडियममध्ये सिगारेट पिण्याची त्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2012 च्या सीजनमध्येही शाहरुख स्टेडियममध्ये सिगारेट पिताना दिसला होता. त्यावेळी जयपूरच सवाई मानसिंह स्टेडियम होतं. या प्रकरणी जयपूरच्या लोकल कोर्टात त्याच्याविरोधात केस दाखल झाली होती. त्याशिवाय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफसोबत वाद घातल्यामुळे अनेक वर्ष स्टेडियममधील त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.