सिडनी: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला लय सापडली आहे. त्याच्याकडून ज्या कामगिरीची अपेक्षा होती, तसा परफॉर्मन्स तो करतोय. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सुरुवातीला शाहीन शाह त्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता. आज पहिल्या सेमीफायनलमध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. या मॅचमध्ये शाहीनने न्यूझीलंडचा कॅप्टन विलियम्सनचा विकेट घेतला. शाहीनने त्याच्या बेल्स उडवल्या.
डेथ ओव्हर्समध्ये विलियम्सनची विकेट
न्यूझीलंड विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदीने किफायती गोलंदाजी करताना विकेटही घेतल्या. त्याने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्याने फिन एलन आणि केन विलियम्सन या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. एलनला त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये विलियम्सनची विकेट काढली.
हा चेंडू बॅटला कनेक्ट करु शकला नाही
कॅप्टन बाबर आजमने शाहीन शाहच्या ओव्हर्स वाचवून ठेवल्या होत्या. तो 17 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी विलियम्सन क्रीजवर होता. 17 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विलियम्सन सूर्यकुमार यादवसारखा स्कूप शॉट खेळायला गेला. विलियम्सन हा चेंडू बॅटला कनेक्ट करु शकला नाही. चेंडूने थेट मिडल-लेग स्टम्प उडवला. बेल्स लांबलचक उडाल्या.
पाकिस्तानला किती धावांचे लक्ष्य
डॅरेल मिचेलने फटकेबाजी केली. त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. त्याच्या बॅटिंगमुळे न्यूझीलंडला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मिचेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या. न्यूझीलंडने न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 152 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य दिले आहे.