मुंबई: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) खेळत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर टीम इंडियाला झटका बसला होता. त्याच्याजागी मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) टीममध्ये समावेश करण्यात आला. शमीने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वॉर्मअप मॅचमध्ये लास्ट ओव्हर टाकली. या एकाच षटकात 4 विकेट घेऊन त्याने ऑस्ट्रेलियाची वाट लावली.
मोहम्मद शमीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. अनेक गोलंदाजांना त्याच्याकडून शिकायची इच्छा असते. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला ही संधी मिळाली. त्याने शमीकडून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला.
फोटो व्हायरल
आयसीसी वर्ल्ड कपआधी आज टीम इंडिया आणि पाकिस्तानची टीम वॉर्मअप मॅच खेळली. टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला. पाकिस्तानची मॅच इंग्लंड विरुद्ध. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु असताना, सोशल मीडियावर शमी आणि शाहीन शाह आफ्रिदीचा एक फोटो व्हायरल झाला.
काय होतं त्या फोटोत?
त्या फोटोमध्ये शमी शाहीन शाह आफ्रिदीला काहीतरी शिकवताना दिसतोय. शमीच्या हातात चेंडू असून तो हाय आर्म Action ने शाहीनला काहीतरी सांगत होता. शाहीन सुद्धा खूप लक्षपूर्वक शमीची हाताची Action पहात होता.
शाहीनने केलं होतं हैराण
शाहीनने मागच्यावर्षी यूएईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना हैराण केलं होतं. आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं होतं. आता पाकिस्तान आणि भारतामध्ये येत्या 23 ऑक्टोबरला वर्ल्ड कप टी 20 ची मॅच होणार आहे.
Shami sharing his experience with Shaheen during the practice session. pic.twitter.com/3PwlxcbDcR
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2022
शाहीनवर सगळ्यांच्या नजरा
मेलबर्न ही मॅच होईल. या मॅचमध्ये शाहीनवर सगळ्यांच्या नजरा असतील. शाहीन भारतीय फलंदाजांना कशी गोलंदाजी करतो? यावर सगळ्यांच लक्ष असेल. शाहीन दुखापतीमुळे आशिया कप 2022 मध्ये खेळू शकला नाही. तो दुखापतीवर उपचार करण्यासाठी इंग्लंडला गेला होता. आता तो तंदुरुस्त असून भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे.