लाहोर : वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरेच बदल पहायला मिळतायत. बाबर आजमने तिन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व सोडलय. त्याच्याजागी शान मसूदला टेस्ट आणि शाहीन शाह आफ्रिदीला T20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलय. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तीन टेस्ट मॅचची सीरीज सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी शाहीनच्या नेतृत्वाबद्दल मोठी गोष्ट बोलून गेला.
शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सचा कॅप्टन आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या नेतृत्वाखाली टीमला किताब जिंकून दिलाय. आता त्याच्यावर पाकिस्तानच्या T20 टीमची जबाबदारी आहे. 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे, त्या दृष्टीने सुद्धा शाहीद आफ्रिदीच स्टेटमेंट महत्त्वाच आहे. शाहीन हा शाहीद आफ्रिदीचा जावय आहे.
हे काय बोलून गेला शाहिद आफ्रिदी?
शाहीद आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. एका कार्यक्रमात सीनियर आफ्रिदीने जावई म्हणजे शाहीनच्या नेतृत्वाची नाही, तर मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाच कौतुक केलं. रिजवानची मेहनत आणि फोकस यामुळे मी प्रभावित झालोय, असं शाहीद आफ्रिदी म्हणाला. रिजवानची सर्वात कुठली गोष्ट आवडते, ती म्हणजे तो खेळावर लक्ष देतो, असं आफ्रिदी म्हणाला. कोण काय करतय? याने त्याला अजिबात फरक पडत नाही. त्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला की, “मला रिजवानला पाकिस्तानच्या T20 टीमच कॅप्टन बनलेलं पहायच होतं, पण चुकून शाहीनला कॅप्टन बनवलं” तो मस्करीत असं बोलला.
जावयाबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदी कधीच मागे पुढे नाही पाहत
शाहीनच लग्न शाहीद आफ्रिदीच्या मुलीसोबत झालय. दोघांमध्ये सासरा-जावयाच नातं आहे. शाहीद आफ्रिदी कधीच शाहीनवर टीका करताना मागे-पुढे पाहत नाही. शाहीनच्या नेतृत्वाबद्दल तो पहिल्यांदा असं बोललेला नाही. लाहोर कलंदर्सच्या टीमने शाहीनला कॅप्टन बनवलं, तेव्हा सुद्धा शाहीद आफ्रिदीने मतप्रदर्शन केलं होतं. कॅप्टन बनू नकोस, असा त्याने शाहीनला सल्ला दिला होता. शाहीनने एक-दोन वर्ष कॅप्टनशिपपासून लांब राहून खेळावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं शाहीद आफ्रिदीच मत आहे.