IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने कमाल केलीय. त्यांनी सलग तीन सामने जिंकलेत. पॉइंट टेबलमध्ये मध्ये KKR ची टीम टॉपवर आहे. आपल्या टीमच्या विजयी हॅट्ट्रीक नंतर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान खूप आनंदी आहे. दिल्ली विरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर शाहरुख खान विशाखापट्टनमच्या मैदानावर उपस्थित होता. शाहरुख खानने आपल्या टीमच्या परफॉर्मन्सला सलाम केला. केकेआरच्या विजयानंतर शाहरुखने मैदानात जे केलं, त्याने अनेकांच मन जिंकलं. शाहरुख खान मॅच संपल्यानंतर मैदानात आला. शाहरुखने केकेआरच्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली.
कॅप्टन श्रेयस अय्यर, मेंटॉर गौतम गंभीर, रिंकू सिंह आणि तुफानी फलंदाजी करणाऱ्या अंगकृष रघुवंशीला त्याने विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शाहरुखने फक्त आपल्या टीमच्या खेळाडूंवर प्रेम व्यक्त केलं असं नाहीय, तो दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना सुद्धा भेटला. खासकरुन ऋषभ पंत बरोबर बराचवेळ बोलला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला. पण स्वत: ऋषभने कमालाची बॅटिंग केली. शाहरुखने म्हणून ऋषभच सुद्धा कौतुक केलं. 2022 च्या रस्ते अपघातानंतर ऋषभ पंतने आता क्रिकेट मैदानावर पुनरागमन केलय. त्याच्या बॅटमधून सुद्धा धावांचा पाऊस पडतोय.
From SRK with love 🤗 ☺️
Signing off from Vizag 🫡#TATAIPL | #DCvKKR | @DelhiCapitals | @KKRiders | @iamsrk pic.twitter.com/XL7HuIEPyL
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
त्याच्यामुळे केकेआर आज टॉपवर
या सीजनमध्ये केकेआरची टीम मजबूत दिसतेय. गौतम गंभीरच टीममध्ये पुनरागमन हे त्यामागे कारण आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनवेळा आयपीएलच किताब जिंकलाय. आता तो मेंटॉर म्हणून टीमसोबत आहे. काही कारणांमुळे गंभीर केकेआरपासून लांब गेला होता. पण आता हा दिग्गज पुन्हा टीममध्ये आलाय. गंभीर टीममध्ये आला, त्यामध्ये शाहरुख खानची भूमिका महत्त्वाची आहे. गंभीरचा विचार आणि दूरदृष्टी याचा टीमला फायदा होतोय.