T20 WC 2024 : एका मॅचमध्ये धावा होताच बांग्लादेशी खेळाडूला इतका माज, सेहवागबद्दल म्हणतो, तो…VIDEO

| Updated on: Jun 15, 2024 | 8:15 AM

T20 WC 2024 : T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बांग्लादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसनची बॅट पहिल्यांदा चालली. नेदरलँड्स विरुद्ध सामन्यात त्याने 46 चेंडूत नाबाद 64 रन्स केल्या. शाकीबने पहिल्या सामन्यात फक्त 8 रन्स केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये त्याची स्थिती यापेक्षा पण वाईट होती.

T20 WC 2024 : एका मॅचमध्ये धावा होताच बांग्लादेशी खेळाडूला इतका माज, सेहवागबद्दल म्हणतो, तो...VIDEO
shakib al hasan
Image Credit source: AFP
Follow us on

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बांग्लादेशच्या शाकीब अल हसनने पहिल्या सामन्यात 8 धावा केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये स्थिती यापेक्षा पण वाईट. बनवले फक्त 3 रन्स. आता तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्स सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध अर्धशतक ठोकलं. या अर्धशतकामुळे शाकीब अल हसनला इतका माज आला की, त्याने विचारलं कोण वीरेंद्र सेहवाग?. बांग्लादेश-नेदरलँड्स सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यातील ही घटना आहे. एक प्रश्नावर वैतागून शाकीबने हा माज दाखवला. आता तो असं का म्हणाला? ते सुद्धा जाणून घ्या.

शाकीब अल हसनला वींरेंद्र सेहवाग कोण? हे चांगलं माहितीय. तो ओळखत नाही, वैगेरे असं काही नाहीय. शाकीबच्या भडकण्याच कारण आहे, सेहवागने उपस्थित केलेला प्रश्न. T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यात शाकीब फेल ठरल्यानंतर सेहवागने त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांग्लादेशचा पराभव झाल्यानंतर सेहवागने त्याच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. सेहवाग म्हणालेला की, “तुम्ही कोणी हेडन किंवा गिलख्रिस्ट नाही. एक बांग्लादेशी खेळाडू आहात. तुम्ही तसच खेळलं पाहिजे” इतकच नाही सेहवागने त्याला निवृत्तीचा सल्ला सुद्धा दिला होता.

पत्रकाराच बोलणं संपण्याआधीच शाकीब म्हणाला

त्यानंतर पुढच्याच नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात शाकीबने 46 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. प्लेयर ऑफ द मॅच बनल्यानंतर त्याने सेहवागच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने सेहवाग जे बोलला, त्या बद्दल शाकीबला विचारलं. त्यावर पत्रकाराच बोलणं संपण्याआधीच शाकीब म्हणाला की, कोण वीरेंद्र सेहवाग?


तर, मग प्रश्नच नव्हता

शाकीब ज्या पद्धतीने बोलला, त्यावरुन स्पष्ट दिसत होतं की, सेहवागची टीका त्याला आवडलेली नाही. एका मॅचमध्ये धावा केल्यानंतर इतका माज दाखवण कितपत योग्य आहे. कारण शाकीबने हा सुद्धा विचार केला पाहिजे की, कुठल्या टीम विरुद्ध मी या धावा केल्या आहेत. जर, त्याने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध या धावा केल्या असत्या, तर प्रश्नच नव्हता.

शाकीबमध्ये क्षमता आहे, याबाबत अजिबात शंका नाही. वनडे आणि T20 दोन्ही फॉर्मेटमध्ये वर्ल्ड कपमध्ये तर 800 प्लस धावा आणि 40 पेक्षा जास्त विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू आहे.