VIDEO: आधी ओरडला, नंतर बॅट घेऊन अंपायरच्या दिशेने धावला, LIVE मॅचमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटूने घातला राडा

| Updated on: Jan 08, 2023 | 12:52 PM

'हा' प्रसिद्ध क्रिकेटपटू थेट अंपायरला मैदानात भिडला, त्याची मैदानावरील ही कृती, वर्तन चर्चेचा विषय ठरलाय.

VIDEO: आधी ओरडला, नंतर बॅट घेऊन अंपायरच्या दिशेने धावला, LIVE मॅचमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटूने घातला राडा
Match
Image Credit source: Screengrab
Follow us on

ढाका: क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा खेळाडूंचा स्वत:वरील ताबा सुटतो. मैदानातील परिस्थितीमुळे खेळाडू चिडतात. काहीवेळा हे प्लेयर्स विरोधी टीमच्या प्लेयर्सना भिडतात किंवा थेट अंपायर्सशी वाद घालतात. बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये अशीच एक घटना घडलीय. फॉर्च्यून बारीशाल आणि सिल्हट स्ट्रायकर्समध्ये मॅच सुरु होती. शाकीब अल हसनचा क्रिकेट विश्वातील टॉप ऑलराऊंडर्समध्ये समावेश होतो. पण अनेकदा त्याचा स्वत:वरील ताबा सुटतो. मागच्यावर्षी अंपायर्स बरोबर खराब व्यवहार केल्यामुळे शाकीबवर बरीच टीका झाली होती.

काही धडा घेतलेला नाही

पण शाकीबने यामधून काही धडा घेतलेला नाही. आता पुन्हा एकदा शाकीबने अंपायर बरोबर हुज्जत घातली. थेट बॅट घेऊन अंपायरच्या दिशेने धावला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

म्हणून शाकीबला राग आला

बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बारीशाल आणि सिल्हट स्ट्रायकर्समध्ये मॅच सुरु होती.शाकीब अल हसन बारीशालकडून खेळत होता. इनिंगमधील 16 वी ओव्हर सुरु होती. स्ट्रायकर्सचा पेसर रेजूर रहमान गोलंदाजी करत होता. त्याने ओव्हरमधील चौथा चेंडू बाऊन्सर टाकला. हा चेंडू शाकीबच्या डोक्यावरुन गेला. या चेंडूला नो बॉल किंवा वाइड द्यावा, असं अंपायरला वाटलं नाही. त्यांनी हा चेंडू लीगल ठरवला. बस एवढ्याशा गोष्टीवर शाकीब भडकला. अंपायरने हा चेंडू नो बॉल दिला नाही, म्हणून शाकीबला राग आला होता.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लेग अंपायरकडे पाहून शाकीब जोरात ओरडला. तो बॅट घेऊन अंपायरच्या दिशेने धावला. वाइड चेंडू का दिला नाही? याचा जाब विचारला. यावरुन अंपायर आणि त्याच्यात वाद झाला. विकेटकीपर मुश्फिकुर रहीमने हस्तक्षेप करुन विषय शांत केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शाकिबची इनिंग गेली वाया

शाकीब अल हसनने सिल्हट टायगर्स विरुद्ध आक्रमक बॅटिंग केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याने 32 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. 194 धावा करुनही त्यांच्या टीमचा 6 विकेटने पराभव झाला.