ब्रिस्बेन: टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच टीम आपल्याबाजूने जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रत्येक टीम चॅम्पियन बनण्यासाठी मैदानावर घाम गाळतेय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने आपल्याच टीमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमची टीम टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेली नाही, असं शाकीब म्हणाला. भारताविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या मॅचआधी शाकीबने हे चक्रावून टाकणार विधान केलं आहे. शाकीब अल हसन मीडियासमोर स्पष्टपणे बोलला, “टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आली आहे. आमची टीम वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेली नाही”
….तर तो एक धक्कादायक निकाल असेल
“आम्ही इथे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलो नाही. भारत इथे जिंकण्यासाठी आला आहे. बांग्लादेशने भारताला हरवलं, तर तो एक धक्कादायक निकाल असेल” असं शाकीब अल हसन म्हणाला. बांग्लादेशी कॅप्टनच हे विधान खूपच धक्कादायक आहे. हा खेळाडू आपल्या टीमला टी 20 वर्ल्ड कप 2022 विजेतेपदाचा दावेदार मानत नाही.
पॉइंटस टेबलमध्ये बांग्लादेश कुठे?
बांग्लादेशची टीम सुपर-12 राऊंडमध्ये तीन पैकी दोन सामने जिंकली आहे. ग्रुप 2 मध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा नेट रनरेट -1.533 आहे. दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे नेट रनरेटमध्ये त्यांची ही स्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर बांग्लादेशने नेदरलँडस आणि झिम्बाब्वेवर विजय मिळवला.
भारताचं आव्हान बांग्लादेशसाठी सोपं नाही
भारतावर मात करणं बांग्लादेश टीमसाठी इतकं सोपं नाहीय. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना गमावला. पण भारताची बॅटिंग युनिट फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवने सलग दोन सामन्यात दोन अर्धशतक ठोकली आहेत. सूर्यकुमार यादवपासूनच मुख्य धोका असल्याचं शाकीब अल हसनने मान्य केलं. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा बेस्ट टी 20 फलंदाज आहे, असं शाकीब अल हसन म्हणाला.
शाकीब फ्लॉप
टी 20 वर्ल्ड कपमध्ये शाकीबच प्रदर्शन खूपच खराब आहे. बांग्लादेशी कॅप्टनने 3 मॅचमध्ये 10.33 च्या सरासरीने 31 धावाच केल्या आहेत. शाकीबचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा कमी आहे. गोलंदाजीत त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 9 रन्सपेक्षा जास्त आहे.