सिडनी: मागच्या आठवड्यात जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं. वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात (Thailand villa) अखेरचा श्वास घेतला. तिथे तो मित्रांसमवेत सुटट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वॉर्नच निधन झालं. शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूमुळे विविध शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. शेन वॉर्नच पार्थिव शरीर आता ऑस्ट्रेलियात (Australia) नेण्यात आलं आहे. आता शेन वॉर्नची काऊन्सलर समोर आली आहे. तिने या महान फिरकी गोलंदाजाबद्दल काही खुलासे केले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून शेन वॉर्न खूश होता. त्याला असं वाटत होतं की, अजून त्याच्याकडे तीस वर्षांच आयुष्य बाकी आहे. ‘द सन’ दैनिकाने हे वृत्त दिलं आहे.
आरोग्याची चिंता नव्हती
वॉर्नची काऊंन्सलर लियान यंगने ही माहिती दिली. लियान यंग 2015 पासून शेन वॉर्नसोबत आहे. शेन वॉर्न त्याच्या भविष्यासाठी तयारी करत होता. त्याने तीन महिन्यांची सुट्टी घेतली होती. आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी म्हणून त्याने ही सुट्टी घेतली होती. आरोग्याची त्याला फार चिंता नव्हती. आपल्याकडे जगण्यासाठी अजून 30 वर्ष आहेत, असं त्याला वाटतं होतं. शेन वॉर्नला आपल्या फॅट शेमिंग फोटोमुळे नाराज होता. त्यानंतर तो 14 दिवसांच्या ज्यूस डाएटवर गेला होता. तो सतत आपल्या फिटनेसवर लक्ष देत होता, असे लियाम यंग म्हणाली.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या मृत्यूमागे कुठलाही घातपात आढळलेला नाही. शेन वॉर्न रहात असलेल्या व्हिलामध्ये काही महिला मसाजसाठी गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.