लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत खेळणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. भारताकडे सध्या केवळ 153 धावांचीच आघाडी असल्याने विराटसह पुजारा, शर्मा या दिग्गजांवर टीकेची झुंबड उडाली आहे. अजिंक्य रहाणे (61) सोडता कोणत्याच भारतीय फलंदाजाने खास कामगिरी केलेली नाही. त्यात पहिल्या डावातही भारतीय गोलंजानी हवी तशी कामगिरी न केल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजाच्या हातातच सामना जिंकवण्याची सर्व जबाबदारी असणार आहे. अशावेळी दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नने (Shane warne) विराटच्या रणनीतीवर प्रश्न उठवत अधिक फिरकीपटू न खेळवल्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
शेन वॉर्नने एक ट्वीट केलं ज्यात त्याने लिहिलं आहे की, ”फिरकीपटू हे कधीही खेळ फिरवू शकतात. मैदानाची स्थिती कशीही असो फिरकीपटूंना खेळवने फायद्याचेच ठरते. केवळ पहिल्या डावाचा विचार करुन तुम्ही संघ निवड करणे चूकीचे आहे. फिरकीपटूचं सामना जिंकवू शकतात.” दरम्यान शेनच्या या ट्विटमुळे विराटने आश्विनला न खेळवण्याचा निर्णय चूकला असल्याचेच जणू त्याने सूचित केले आहे.
A spinner turning the game !!!! Surprise surprise, this is why you always play a spinner no matter what the conditions ! Remember you don’t pick a team just for the first innings. Spin to win @SkyCricket ??????
— Shane Warne (@ShaneWarne) August 15, 2021
वरील ट्विटच्या काही वेळ आधीच शेनने एक ट्विट करत ऋषभ पंत हा त्याचा सध्याच्या काळातील आवडता फलंदाज असल्याचे त्याने सांगितले. पंतचा खेळ पाहायला आवडतं, आधुनिक क्रिकेटमधील तो माझा आवडता खेळाडू असल्याचं शेनने म्हटलं आहे. तसंच मला कसोटी क्रिकेट खूप आवडतं असंही शेनने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
I think @RishabhPant17 is one of my fav modern cricketers to watch & I will say it again – I love test cricket @SkyCricket ❤️
— Shane Warne (@ShaneWarne) August 15, 2021
हे ही वाचा
IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार
(Shane warne targets Virat Kohli on his team selection in india vs england second test)