IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी BCCI ने अचानक एक चाल खेळली आहे. त्यांनी टीममध्ये एका धोकादायक मॅचविनरचा समावेश केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 17 मार्चपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. दोन्ही टीम्स तीन वनडे सामने खेळणार आहेत. सीरीजची पहिली मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे. टीम इंडियात एका ऑलराऊंडरचा समावेश करण्यात आला आहे. त्याच नाव आहे शार्दुल ठाकूर. त्याच्या समावेशामुळे गोलंदाजी आणि फलंदाजीत आणखी संतुलन साधता येईल. कारण शार्दुल बॉलिंग बरोबर बॅटिंगही करु शकतो.
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. वेगवेगळ्या वॅरिएशनने तो चेंडू टाकू शकतो. त्यामुळे कुठल्याही बॅट्समनसाठी तो धोकादायक गोलंदाज आहे. शार्दुल ठाकूर सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करु शकतो.
विजयात त्याची महत्त्वाची भूमिका
शार्दुल ठाकूर टीम इंडियाकडून आपला शेवटचा वनडे सामना जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. टीम इंडियाचा हा प्लेयर यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसू शकतो. जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध इंदोर वनडेमध्ये तो खेळला होता. या सामन्यात त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शार्दुलने या मॅचमध्ये आधी बॅटिंग करताना 17 चेंडूत 25 धावा फटकावल्या. शार्दुलच्या या छोट्या इनिंगमध्ये एक सिक्स आणि 3 फोर होते.
परफॉर्मन्ससाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
त्यानंतर शार्दुलने गोलंदाजीत कमाल दाखवली. त्याने 3 विकेट काढले. त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित झाला. भारताने या सामन्यात न्यूझीलंडला 90 धावांनी हरवून तीन वनडे सामन्यात 3-0 ने क्लीन स्वीप केलं. शार्दुल ठाकूरला त्याच्या परफॉर्मन्ससाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता.
या बाबतीत शार्दुल हार्दिकवर पडेल भारी
शार्दुल ठाकूरच्या परफॉर्मन्समुळे एकवेळ हार्दिक पंड्याच टीममधील स्थान धोक्यात वाटत होत. पण आता हार्दिकने सुद्धा स्वत:च नेतृत्व प्रस्थापित केलय. हार्दिक आणि शार्दुल दोघे प्लेइंग 11 मध्ये असतील, तर टीम इंडियाती ताकत आणखी वाढेल. शार्दुल ठाकूर ऑलराऊंडर म्हणून टेस्ट, वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये मुख्य दावेदार आहे. हार्दिक पंड्या फक्त वनडे आणि टी 20 क्रिकेट खेळतो. टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक फिटनेसपासून हार्दिक अजून लांब आहे. त्यामुळे या शर्यतीत शार्दुल हार्दिकला मागे टाकू शकतो.
वनडे, टी 20 आणि टेस्टमधले आकडे काय सांगतात?
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. शार्दुलच्या गोलंदाजीत चांगला स्विंग आहे. बॅटिंग करतानाही तो मोठे फटके खेळू शकतो. शार्दुल ठाकूर भारतासाठी 8 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 27 विकेट घेतलेत. शार्दुलच्या नावावर 34 वनडेमध्ये 50 विकेट आणि 25 टी 20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये 33 विकेट आहेत.