मुंबई: एयरपोर्टवर काहीवेळा लोकांच सामान गायब होतं. काही वेळा उशिराने सामान पोहोचतं. असंच काहीस टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरसोबत (Shardul Thakur) घडलं. मुंबई एयरपोर्टवर (Mumbai Airport) बराच वेळ शार्दुल ठाकूरच सामान आलं नाही. त्यानंतर त्याने या प्रकरणात टि्वट केलं. शार्दुल ठाकूरने 11.42 वाजता टि्वट करुन अजून किटबॅग (Kitbag) मिळाली नसल्याचं सांगितलं. लगेज बेल्टवर तो वाट पाहत होता. एयरलाइन्सचे कर्मचारी सुद्धा तिथे नव्हते.
हरभजनने दिलं उत्तर
शार्दुल ठाकूरच्या या टि्वटवर हरभजन सिंहने लगेच टि्वटच्या माध्यमातून उत्तर दिलं. “शार्दुल तुम्हाला तुमचं सामान मिळेल. आमचा स्टाफ तिथे पोहोचेल. तुला झालेल्या त्रासाबद्दल खेद आहे” असं हरभजनने टि्वटमध्ये म्हटलं होतं. हरभजन एयर इंडियाकडून क्रिकेट खेळलाय.
अखेर शार्दुलला त्याचं सामान मिळालं
त्यानंतर शार्दुल ठाकूरने त्याला त्याचं सामना मिळाल्याची माहिती दिली. एयरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने त्याची मदत केली. असं पहिल्यांदा माझ्यासोबत घडलेलं नाही, असं सुद्धा ठाकूरने टि्वटमध्ये म्हटलं होतं.
@airindiain can you send someone to help me at the luggage belt ? Not the first time that my kit bags haven’t arrived and no staff present at the location either !!
— Shardul Thakur (@imShard) October 12, 2022
शार्दुल ऑस्ट्रेलियाला जाणार
शार्दुल ठाकूर रिझर्व्ह खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा स्क्वाडमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर रिझर्व्ह खेळाडू म्हणून टीममध्ये असतील. दीपक चाहर दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलाय.
My dear we will make sure you get your bag and our staff will will be there to assist you.. sorry for the inconvenience.. (Ex Airindian Bhajji) we love you https://t.co/RKyj3mWicE
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 12, 2022
शार्दुल ठाकूर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये खेळला. ठाकूरने 3 मॅचमध्ये 3 विकेट घेतल्यात. प्रतिओव्हर त्याचा इकॉनमी रेट साडेपाच आहे. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपमध्ये शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ठाकूरला ऑस्ट्रेलियन विकेट्सचाही चांगला अंदाज आहे.