6 फोर आणि 4 सिक्स, 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आणि फक्त 29 चेंडूत कुटल्या नाबाद 61 धावा… हे आकडे त्या फलंदाजाचे आहेत, ज्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. आम्ही बोलतोय शशांक सिंहबद्दल. जो पंजाबच्या विजयाचा खरा किंग ठरला. शशांक सिंहने आपल्या तुफानी बॅटिंगच्या बळावर पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर 3 विकेटने विजय मिळवून दिला. पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांच टार्गेट होतं. शशांकच्या हिटिंगमुळे पंजाबच्या टीमने 1 चेंडू राखून विजय मिळवला. या शानदार इनिगंसाठी शशांक सिंहला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या इनिंगमुळे त्याच्या जुन्या टीमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
मॅच फिनिश करायची प्रॅक्टिस केली, त्यानंतर आज प्रत्यक्षात अमलबजावणी केल्यानंतर खूप आनंद होतोय असं शशांक सिंह म्हणाला. शशांक सिंह म्हणाला की, मी 7 व्या नंबरवर बॅटिंगला येतो. पण आज 5 व्या नंबरवर आलो. मला जास्त मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, असं शशांकने सांगितलं. 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून शशांक सिंहला जास्त संधी मिळाली नाही. पण पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटने शशांकवर विश्वास दाखवला. शशांकने स्पष्टपणे सांगितलं की, “एक खेळाडू तेव्हाच परफॉर्म करु शकतो, जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेऊन संधी दिली जाईल”
Shashank Singh wins it for @punjabkingsipl 👌
His inspirefeul innings takes them over the line 🙌
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/A9QHyeWhnG
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
‘मी गोलंदाजाच नाव नाही, त्याचा चेंडू बघतो’
शशांक सिंहने राशिद खान सारख्या गोलंदाजाची धुलाई केली. शशांकला या बद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला की, ‘मी गोलंदाजाच नाव नाही, त्याचा चेंडू बघतो’ शशांकने गुजरात टायटन्स विरुद्ध हेच केलं. त्याने मिडल ऑर्डरमध्ये सिकंदर रजासोबत 22 चेंडूत 41 धावांची भागीदारी केली. जितेश शर्मासोबत 19 चेंडूत 39 धावांची पार्ट्नरशिप केली. आशुतोष शर्मासोबत 22 चेंडूत 43 धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावरच पंजाबने रोमांचक विजय मिळवला.