India vs England Women Under-19 World Cup : भारताच्या महिला टीमने इंग्लंडला 7 विकेटने हरवून अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावल आहे. ट्रॉफी जिंकून शेफाली वर्माने देशवासियांना खूप सुंदर गिफ्ट दिलय. भारतीय प्लेयर्सनी शानदार खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची टीम ढेपाळली. मॅच संपल्यानंतर शेफाली वर्मा भावनिक झाली होती. तिने मोठं विधान केलय. “ज्याप्रमाणे सगळ्या मुलींनी चांगलं प्रदर्शन करुन एक-दुसऱ्याच समर्थन केलं, ते खरोखरच आनंददायी आहे. आम्ही इथे कप जिंकण्यासाठी आलो होतो” समर्थन करणाऱ्या सर्वांचे शेफाली वर्माने आभार मानले. हे सर्व बोलत असताना शेफाली खूपच भावूक झाली होती.
या प्लेयरच केलं कौतुक
“मला इतकी चांगली टीम दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार. कप जिंकल्यामुळे मी आनंदात आहे. टुर्नामेंटमध्ये श्वेता सेहरावतने दमदार खेळ दाखवला. फक्त तिनेच नाही, अर्चना, सौम्या आणि बाकी खेळाडूंच प्रदर्शन सुद्धा अविश्वसनीय होतं” असं शेफाली म्हणाली.
शेफाली इथेच थांबणार नाही
आयसीसीकडून पहिल्यांदाच महिला अंडर 19 वर्ल्ड कपच आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियाने आयसीसीने या वयोगटासाठी पहिल्यांदाच आयोजित केलेला वर्ल्ड जिंकला तसच भारतीय महिला क्रिकेटमधील हा पहिला वर्ल्ड कप आहे. शेफाली एवढ्यावरच थांबणार नाहीय. अंडर 19 वर्ल्ड कप तुझ्यासाठी एकमेव मोठी ट्रॉफी आहे का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने दक्षिण आफ्रिकेत 10 ते 26 फेब्रवारी दरम्यान आगामी महिला टी 20 वर्ल्ड कपकडे इशारा केला.
emotional shafali Verma after winning the final ?? ????? #U19T20WorldCup #indvseng pic.twitter.com/U8G7K1U43j
— sameer khan⁴⁵ (@Mohamma79230816) January 29, 2023
बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतिक्षा
“बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतिक्षा करत होते. आमच्या डोक्यात एक योजना होती. सुदैवाने जी योजना बनवलेली त्यावर अमलबजावणी केली. स्पिनर्सनी चांगली कामगिरी केली” असं शेफाली म्हणाली.
तीन वर्षापूर्वीची सल भरुन निघाली
तीन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. शेफाली वर्मा त्या टीमचा भाग होती. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात 2020 महिला टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना झाला. ऑस्ट्रेलियाने 185 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 99 धावात आटोपला होता. आता 2023 मध्ये पोचेफस्ट्रूम येथे वर्ल्ड कप विजयाने मनात असलेली ती सल भरुन निघाली. या प्रसंगी शेफाली वर्माच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले. भारतीय महिला क्रिकेटने वास्तवात एक मोठा टप्पा गाठलाय.