मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) शिखर धवनने (Shikhar Dhawan) एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली (Virat kohli) नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. शिखर धवन तीन वर्ष 2021 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. पंजाब किंग्सने त्याला 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतलं. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. धवनने या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरोधात 43, केकेआर विरुद्ध 16, चेन्नई विरुद्ध 33, गुजरात टायटन्स विरुद्ध 35, मुंबई इंडियन्स विरुद्ध 70, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 8 आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 9 धावा केल्या. शिखर धवन आज आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळतोय.
धवनने सोमवारी सीएसके विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. शिखर धवनचं दिल्ली कॅपिटल्सकडून आय़पीएल करीयर सुरु झालं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. 2019 ला पुन्हा तो दिल्लीच्या संघात आला. त्याआधी तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला.
Milestone ? – 6000 IPL runs and counting for @SDhawan25 ??
He is only the second player to achieve this feat in IPL.#TATAIPL #PBKSvCSK pic.twitter.com/G4Eq1t88Dx
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 16 सामन्यात त्याने 587 धावा केल्या. 2020 मध्ये दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 618 धावा केल्या. यात त्याची दोन शतक आणि चार अर्धशतक होती. त्याआधीच्या सीजनमध्ये त्याने 521 धावा चोपल्या होत्या. यात नाबाद 97 त्याची सर्वोत्तम खेळी होती.
शिखर धवनला पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. दिल्ली कॅपिटल्सने त्याला पुन्हा आपल्या चमूत घेण्यासाठी ऑक्शनमध्ये जोरदार बोली लावली. पण पंजाबने बाजी मारली.