कोलंबो : युवा खेळाडू असलेला भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून या संघाचं कर्णधारपद शिखर धवनला (Shikhar Dhawan) सोपवण्यात आलं आहे. दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी खेळाडू कसून सराव करत आहेत. सराव सामन्यांसह जीममध्येही घाम गाळत आहेत. पण या सर्वात थोडा विरंगुळा म्हणून खेळाडू त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणि खेळ खेळत आहेत. यातच कर्णधार शिखर धवन बासरी वादन करत असून गाणं गाऊन फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) त्याला साथ देत आहे.
या गाण्याचा आणि बासरीवादनाचा व्हिडीओ शिखरने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शिखरने पृथ्वीला मिश्किलपणे सुपरस्टार सिंगर असंही म्हटलं आहे. या व्हिडीओला लाखोंच्या वर लाईक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओमध्ये पृथ्वी सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा ये शाम मस्तानी हे गाणं गात असून त्याच गाण्याची धुन शिखर बासरीवर वाजवत आहे.
मागील बरीच वर्ष भारताकडून सलामीवीराची भूमिका निभावणाऱ्या शिखर धवनला अखेर कर्णधारहोण्याचा मान मिळाला आहे. पण हा मान एक मोठी जबाबदारी असल्याने शिखरकडून अनेक अपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) देशवासियांना आहेत. श्रीलंका दौऱ्यातील तीन टी-20 सामने हे आगामी टी-20 विश्वचषकाची रंगीत तालिमचं असल्याने या सामन्यांत भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात हे महत्त्वाचं आहे. त्यात शिखर संघाचा कर्णधार असल्याने त्याला संघाच्या कामगिरीसह स्वत:ची कामगिरीही चांगली होईल याकडे लक्ष देण गरजेचं आहे.
या संपूर्ण दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने पार पडणार आहेत. ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आधी 13 जुलै रोजी सामन्यांना सुरुवात करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
सामन्यांचे वेळापत्रक
हे ही वाचा :
Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा
IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना
(Shikhar Dhawan Flaunting basri and Pruthvi Shaw Singing Song on it Video Went Viral)