IPL 2022: शिखर धवनने घरात पाऊल ठेवताच वडिलांनी कानाखाली मारली, लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा VIDEO

| Updated on: May 26, 2022 | 5:31 PM

IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनची पहिली खरेदी करण्यात आली. पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपये मोजून शिखरला विकत घेतलं.

IPL 2022: शिखर धवनने घरात पाऊल ठेवताच वडिलांनी कानाखाली मारली, लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा VIDEO
shikhar dhawan
Image Credit source: PTI/instagram
Follow us on

मुंबई: टीम इंडिया आणि पंजाब किंग्सचा (Punjab kings) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) नेहमीच सोशल मीडियावर Active असतो. गमतीशीर मीम्स आणि रील्सच्या माध्यमातून शिखर आपल्या फॅन्सचं मनोरंजन करतो. शिखर धवनने आता त्याच्या इन्स्टाग्रामवर एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केलाय. जो पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हसू येईल. या व्हिडिओमध्ये शिखरचे वडिल त्याला मारहाण करताना तुम्हाला दिसतील. “नॉक आउट मध्ये क्वालिफाय करु शकलो नाही, म्हणून मला माझ्या डॅडने नॉक-आउट केलं” असं शिखरने या व्हिडिओला कॅप्शन दिलय. धवनने व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताच कमेंटसचा जणू पूर आला. हरभजन सिंगने शिखर धवनच्या वडिलांचं कौतुक केलं. “रीलमध्ये त्यांनी खूप सुंदर अभिनय केला. बप्पू तुझ्यापेक्षाही चांगले अभिनेते ठरतील” असं हरभजन शिखरच्या वडिलांच कौतुक करताना म्हणाला.

8.25 कोटीमध्ये धवनला खरेदी केलं

IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनची पहिली खरेदी करण्यात आली. पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपये मोजून शिखरला विकत घेतलं. धवनने यंदाच्या सीजनमध्ये 14 सामन्यात एकूण 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या. धवनने तीन अर्धशतक झळकवली. 88 त्याचा बेस्ट स्कोर आहे. शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीनंतर सर्वात यशस्वी फलंदाज आहे.

पंजाब किंग्स सहाव्या स्थानावर

शिखर धवन मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. या सीजनमध्ये पंजाब किंग्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहिला. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची आवश्यकता होती. पण मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सला ते जमलं नाही.

धवनला संघात स्थान नाही

आयपीएल 2022 मध्ये शानदार प्रदर्शन करुनही धवनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. धवन वर्ष 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर शिखरच्या जागी युवा इशान किशनला संधी देण्यात आली.