मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री राजला बेड्या ठोकल्या. अश्लिल चित्रपट बनवल्याचा आणि अॅपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान राजला अटक केल्यानंतर अचानक भारतीय संघातील क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला नेटकरी ट्रोल करु लागले आहेत. याचे कारण रहाणेचे काही वर्षांपूर्वीचे एक ट्विट आहे.
इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) सुरुवातीच्या काळात अजिंक्य रहाणे हा शिल्पा शेट्टीच्या मालकीचा संघ राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी शिल्पाचा नवरा जो संघाचा सहमालकही होता. त्याला एका ट्विटमध्ये मेन्शन करत अजिंक्यने ‘तुम्ही खूप चांगले काम करत आहात सर’ असं लिहिलं होतं. त्यावर राज यानेही रिप्लाय करत ‘धन्यवाद! तू येऊन लाईव्ह पाहू शकतोस’ असा रिप्लायही केला होता. ज्यावर रहाणेने पुन्हा रिप्लाय करत ‘मी नक्कीच भेट देईन’ असंही लिहिलं होतं. हे ट्विट 19 ऑक्टोबर 2012 रोजीचे असून तब्बल 9 वर्षानंतर काही नेटकऱ्यांनी हे ट्विट शोधून रहाणेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
@TheRajKundra Sir you are doing a Great job..
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 19, 2012
@ajinkyarahane88 thanks so much. U must come and see it live
— Raj Kundra (@TheRajKundra) October 19, 2012
@TheRajKundra yeah I wil for sure sir:)
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 19, 2012
अजिंक्य रहाणेच्या संबधित ट्विटचा फोटो व्हायरल करत नेटकरी रहाणेला कमालीचे ट्रोल करत आहेत. अनेक मीम्स तयार करुन नेटकरी रहाणेला ट्रोल करत आहेत. यातीलच काही ट्विट्स…
Kitne Tejaswi log hai humare paas! ?
PMO Ask CBI Report On SSR#BoycottBollywood #RajKundraArrest pic.twitter.com/O0v96YpBFN
— KIZIE #JusticeForSushantSinghRajput (@Sushantify) July 20, 2021
Rahane talking to Raj Kundra pic.twitter.com/DyPg1Ma35I
— sudhanshu` (@whoshud) July 19, 2021
Rahane to Raj Kundra : pic.twitter.com/Y5cXsmIq4K
— N I T I N (@theNitinWalke) July 19, 2021
संबंधित बातम्या :
(Shilpa Shettys Husbend Raj Kundra Arrested after that Cricketer Ajinkya Rahanes Tweet of raj kundra went Viral)