मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब अख्तरच्या (shoaib akhtar) विधानाची भारतातही दखल घेतली जाते. भारतातही लोक त्याला ओळखतात. आज शोएब अख्तरची भारतीय खेळाडूंबरोबर मैत्री आहे. पण करीयर ऐन भरात असताना त्याचे शत्रुही कमी नव्हते. त्याने अनेक भारतीय क्रिकेटपटूंबरोबरही (Indian Cricketers) पंगे घेतले होते. शोएब अख्तरला अलीकडेच अशा एका वादाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर तो भडकला. त्याने लाइव्ह शो मध्ये पत्रकाराला सुनावलं.
वीरेंद्र सेहवागने एका कार्यक्रमात शोएब अख्तर बरोबर झालेल्या वादाचा किस्सा सांगितलं होता. अख्तरने सेहवागला सातत्याने बाऊन्सर चेंडू टाकून हैराण केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर स्ट्राइकवर आला. त्याने शोएबच्या चेंडूवर चौकार मारला. त्यावेळी सेहवाग नॉन स्ट्राइक एन्डवर उभा होता. त्याने शोएब अख्तरकडे बघून ‘बाप-बाप होता है’ असं सुनावलं होतं. सेहवागने शोएबबद्दल सांगितलेला हा किस्सा व्हायरल झाला होता. पुन्हा एकदा हे विधान चर्चेत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर या विषयावरुन पत्रकाराने शोएब अख्तरला प्रश्न विचारला. “बाप-बाप असतो, असं सेहवाग तुम्हाला म्हणाला होता. तुम्हाला हा किस्सा आठवतो का?” त्यावर शोएब भडकला. “पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट तो माझ्या तोंडावर बोलला असता, तर वाचला नसता. त्याने हे विधान कधी केलं, केव्हा बोलला हे मला माहित नाही. मी त्याला याबद्दल एकदा विचारलही. त्यावर मी कधी असं बोललो नाही, असं त्याने मला सांगितलं”
Shoaib Akhtar is on fire ??? pic.twitter.com/A1XtrmveZN
— Taimoor Zaman (@taimoorze) August 27, 2022
“शो मध्ये तुम्ही असे प्रश्न विचारु नका, ज्यामुळे दोन देशांमधील अंतर वाढेल” असं शोएब म्हणाला. “तुम्ही शो मध्ये आवश्यक प्रश्न जरुर विचारा. मी तुमच्या सर्वांचा आदर करतो. भारतातही माझी फॅन फॉलोइंग आहे. नेहमी बोलताना, दोन देशांमधील अंतर वाढणार नाही, याची मी काळजी घेतो. क्रिकेटबद्दल आपण भरपूर चांगल्या गोष्टी बोलू शकतो. मला एकच गोष्ट सारखी सारखी बोलायला आवडत नाही. असे प्रश्न विचारु नका” असं अपील शोएब अख्तरने केलं.