PTV च्या 10 कोटींच्या नोटिशीला घाबरत नाही, लष्कर, सरकार माझ्यासोबत, सडेतोड उत्तर देणार; शोएब अख्तने दंड थोपटले

| Updated on: Nov 10, 2021 | 12:26 PM

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना अख्तर याने 10 कोटींच्या नोटिशीच्या प्रश्नाला उत्तर दिले, यावेळी तो म्हणाला की, "पीटीआयचा (पाकिस्तानचा राजकीय पक्ष) पाठिंबा माझ्यासोबत आहे, सर्व राजकीय पक्ष माझ्यासोबत आहेत.

PTV च्या 10 कोटींच्या नोटिशीला घाबरत नाही, लष्कर, सरकार माझ्यासोबत, सडेतोड उत्तर देणार; शोएब अख्तने दंड थोपटले
Shoaib Akhtar
Follow us on

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि तेथील पीटीव्ही चॅनेचा अँकर नोमान नियाज (Noamn Niyaz) या दोघांमध्ये चालू शोमध्ये वाद झाला होता. जो वाद शोएब अख्तरच्या चांगलाच अंगाशी आला आहे. नुकतीच चॅनेलने अख्तरला 100 मिलियनची मानहानीची नोटीस पाठवली आहे. अख्तरने चालू शोमध्ये कॉन्ट्रॅक्ट संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आणि हे चॅनेलच्या नियमांचं उल्लंघन असल्याचे सांगत चॅनेलने ही कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता अख्तरने त्याच्या बाजूने मोठं वक्तव्य केलं आहे. लष्कर आणि सरकारसह संपूर्ण देश त्याच्यासोबत असल्याचे अख्तरने म्हटले आहे. (Shoaib akhtar reacts on PTV’s legal notice of 100 million)

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना अख्तर याने 10 कोटींच्या नोटिशीच्या प्रश्नाला उत्तर दिले, यावेळी तो म्हणाला की, “पीटीआयचा (पाकिस्तानचा राजकीय पक्ष) पाठिंबा माझ्यासोबत आहे, सर्व राजकीय पक्ष माझ्यासोबत आहेत. लष्करही माझ्यासोबत आहे. सरकारही माझ्यासोबत आहे. आपल्या नॅशनल हिरोच्या बाबतीत असे घडायला नको होते, असा संताप जनतेत आहे. मात्र या लोकांनी हे प्रकरण दुसरीकडे नेले आहे. संपूर्ण मंत्रिमंडळात संक्षिप्त अहवाल पारित झाला आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्यासोबत आहे. पंतप्रधान माझ्यासोबत आहेत. सर्वजण माझ्यासोबत आहेत. मी जर तुम्हाला टीव्हीवर काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला काहीही बोलू शकता. हे लोक जे काही करत आहेत, त्यावर माझ्या वकिलांचं लक्ष आहे, ते प्रत्येक गोष्ट नोटिस करत आहेत. आम्ही पीटीव्हीसोबत प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देऊ.

पीटीवी चोर आहे

अख्तर याने म्हटले आहे की, पीटीव्ही चोर आहे. पीटीव्ही चॅनेल स्वतः चोरी करत आहे आणि नॅशनल हिरोला नोटिस पाठवत आहेत. तुमच्या समितीचा अहवाल आला नाही, नुकसानीची नोटीस कशी पाठवणार? माझ्या बाजूने उत्तर आल्यावर त्यांना समजेल.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, नॅशनल टेलीव्हीजन अॅमिनिस्ट्रेशनने नोटिसमध्ये लिहिलं आहे की,“कॉन्ट्रॅक्टच्या नियांमाप्रमाणे तीन महिन्याची नोटिस दिल्याशिवाय चॅनेल किंवा तिथे काम करणारा एकमेंकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. अख्तरने 26 ऑक्टोबर रोजी चालू शोमध्ये राजीनामा दिला ज्यामुळे पीटीव्ही चॅनेलचं मोठं नुकसान झालं आहे.”

अख्तरवर 100 मिलीयनचा मानहाणीचा दावा

या रिपोर्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “अख्तरने टी20 विश्वचषकादरम्यान अचानाक दुबई सोडली. त्याने पीटीव्ही मॅनेजमेंटला कोणतीच माहिती दिली नाही. उलट हरभजन सिंगसोबत तो भारताच्या एका टीव्ही शोमध्ये दिसून आला. यामुळेही पीटीव्हीतं नुकसान झालं आहे.” दरम्यान या सर्वामुळे चॅनेलने अख्तरवर मानहाणीचा दावा करत 100 मिलियन डॉलर्सची मागणी केली आहे. भारतीय चलणानुसार ही रक्कम 33,33,000 इतके होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

अख्तर हा पीटीव्हीच्या एका शोमध्ये चर्चेत सहभागी होता. पीटीव्हीचा ‘गेम ऑन है’ असं या शोचं नाव असून यावेळी चर्चेदरम्यान अख्तरने पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस राउफ यांचं कौतुक केलं. यावेळी पाकिस्तान सुपर लीगच्या लाहौर कलंदर्स संघातून हे दोघे समोर आले आहेत असं अख्तर म्हणाला. त्यावेळी शोचा अँकर नियाज याने अख्तरला टोकत, ‘शाहीन पाकिस्तानच्या अंडर-19 टीममध्येही असल्याचं आठवून दिलं.’ यावेळी शोएब , ‘मी हारिस राउफपबद्दल बोलतोय’ असं म्हणाला. पण अख्तरचा हा बोलतानाचा अंदाज नियाजला न आवडल्याने दोघांमध्ये वाद झाला. ज्यावेळी नियाजने, अख्तरला चांगलेच सुनावले. तसंच असं ओव्हरस्मार्ट वागणार असाल तर तुम्ही शोमधून जाऊ शकता असंही म्हणाला.

इतर बातम्या

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Shoaib akhtar reacts on PTV’s legal notice of 100 million)