Shoaib Akhtar: शोएब अख्तरने आधी हसत-हसत VIDEO पोस्ट केला आणि नंतर….VIDEO

| Updated on: Nov 03, 2022 | 1:13 PM

"तुला आणि तुझ्या देशाला जे शब्द ऐकायला आवडणार नाहीत, ते तुम्ही आम्हाला बोलायला का भाग पाडता? पण तुम्ही त्या लायक आहात"

Shoaib Akhtar: शोएब अख्तरने आधी हसत-हसत VIDEO पोस्ट केला आणि नंतर....VIDEO
Shoaib-Akthar
Image Credit source: instagram
Follow us on

लाहोर: टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप सुपर-12 राऊंडमध्ये बुधवारी तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 रन्सनी मात केली. हा सामना खूपच रोमांचक ठरला. भारतीय टीम एकवेळ बॅकफूटवर होती. बांग्लादेशची टीम ड्रायव्हिंग सीटवर होती. पण पाऊस आला आणि त्यानंतर सर्व खेळच बदलला. टीम इंडियाने कमालीची गोलंदाजी करुन सामना जिंकला. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर खूप ट्रोल झाला.

खूप आनंदात होता

भारतीय टीम अडचणीत असताना शोएब अख्तर खूप आनंदात होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करुन त्याने आपला आनंदही व्यक्त केला. बांग्लादेशच्या ओव्हरमध्ये 7 वी ओव्हर सुरु असताना पाऊस सुरु झाला. पावसामुळे मॅचची 40 मिनिट वाया गेली. पावसामुळे खेळ थांबला, त्यावेळी बांग्लादेशची टीम डकवर्थ लुईस नियमानुसार 17 रन्सनी पुढे होती. म्हणजे मॅच सुरु झाली नसती, तर टीम इंडियाचा पराभव निश्चित होता.

शोएब अख्तरचा आनंद टीम इंडियाने हिरावला

शोएब अख्तरने त्याचा आनंद व्हिडिओमध्ये व्यक्त केला. बांग्लादेशच्या ओपनर्सनी ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांची फँटी लावली आहे, ते पाहून मजा आली. हे सर्व बोलताना शोएब अख्तर आनंदात दिसत होता. बांग्लादेश या मॅचमध्ये भारताला हरवू शकतो, असं शोएब म्हणाला. बांग्लादेशने ही मॅच जिंकली असती, तर पाकिस्तानची सेमीफायनल गाठण्याची शक्यता थोडी वाढली असती. पण टीम इंडियाने पावसानंतर खेळच पालटून टाकला.

जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे सामना पलटला

पावसानंतर खेळ सुरु झाला, त्यावेळी दोन चेंडूनंतर लिट्टन दास रनआऊट झाला. केएल राहुलने अप्रतिम थ्रो केला. त्यानंतर अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने एकाच ओव्हरमध्ये 2-2 विकेट घेऊन बांग्लादेशला घेरलं. लास्ट ओव्हरमध्ये बांग्लादेशला विजयासाठी 20 धावा हव्या होत्या. अर्शदीपला या ओव्हरमध्ये एक चौकार आणि षटकार बसला. पण त्यानंतर त्याने कुठलीही चूक न करता टीम इंडियाचा विजय सुनिश्चित केला.