ढाका: चटोग्राम कसोटीच्या पहिल्यादिवशी टीम इंडियाने 6 विकेट गमावून 278 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या पहिल्या सेशनमध्ये राहुल, गिल आणि विराटची बॅट तळपली नाही. पण श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा जबरदस्त इनिंग खेळले. पुजाराने 90 धावा केल्या. अवघ्या 10 रन्सने त्याचं शतक हुकलं. श्रेयस अय्यर दिवसाचा खेळ संपताना 82 धावांवर नाबाद आहे. श्रेयसला त्याच्या या इनिंग दरम्यान दोनदा जीवनदान मिळालं.
याला म्हणतात नशीब
श्रेयस अय्यरची आधी कॅच सुटली. त्यानंतर चेंडू स्टम्पला लागूनही तो आऊट झाला नाही. श्रेयसला मिळालेलं दुसरं जीवनदान पाहून बांग्लादेशी खेळाडू सुद्धा दंग झाले. खुद्द अय्यरला सुद्धा आश्चर्य वाटलं. कारण चेंडूने ऑफ स्टम्पला स्पर्श केला होता. बेल्सवरच्या लाइट्सही पेटल्या. पण बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे अय्यर बाद झाला नाही.
दोन्ही जीवनदानामध्ये इबादत हुसैन
श्रेयस अय्यरला दोनदा जीवनदान मिळालं. मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर इबादत हुसैनने सोपा झेल सोडला. त्यानंतर 84 व्या ओव्हरमध्ये इबादत हुसैनचाच चेंडू ऑफ स्टम्पला स्पर्श करुन गेला. पण बेल्स खाली पडल्या नाहीत.
अय्यर सारखा पुजारा भाग्यशाली ठरला नाही
एकाबाजूला श्रेयस अय्यरला दोन-दोन जीवनदान मिळाली. पण चेतेश्वर पुजारा श्रेयस अय्यर इतका भाग्यशाली ठरला नाही. पुजारा चांगली फलंदाजी करत होता. पण व्यक्तीगत 90 धावांवर तो बोल्ड झाला. पुजारा पुन्हा एकदा शतकापासून चुकला. पुजाराने 3 जानेवारी 2019 रोजी आपलं शेवटच कसोटी शतक झळकावलं होतं.
An incredible sequence of play in the #BANvIND Test match as @ShreyasIyer15 is bowled by Ebadot Hossain but the ????? ???? ?????? ?? ???? ?
Your reaction on this close ‘escape’ ❓?#SonySportsNetwork #ShreyasIyer pic.twitter.com/q6BXBScVUz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 14, 2022
भारतासाठी सरासरी दिवस
चटोग्राम कसोटीचा पहिला दिवस भारतासाठी सरासरी ठरला. केएल राहुल 22, शुभमन गिल 20 रन्सवर आऊट झाला. विराट कोहली फक्त एक रन्स करुन बाद झाला. पंतने चांगली सुरुवात केली. पण 46 रन्सवर तो आऊट झाला. अक्षर पटेल दिवसअखेर 14 धावांवर LBW झाला.